नांदेपेरा येथील युवकाचा वणी-भालर मार्गावर आढळला मृतदेह, विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी भालर मार्गावरील एमआयडीसी लगत असलेल्या नगर पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडजवळ एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना आज २० मार्चला सकाळी उघडकीस आली. या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. नांदेपेरा येथील शेतकरी कुटुंबातील सदस्य असलेला हा विवाहित युवक वणी भालर मार्गावर मृतावस्थेत आढळून आला. एक वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला असल्याचे सांगण्यात येते. मंगेश प्रभाकर डोंगे (३२) असे या मृतावस्थेत आढळलेल्या युवकाचे नाव आहे.
वणी तालुक्यातील नांदेपेरा येथे सहकुटुंब वास्तव्यास असलेला मंगेश हा १९ मार्चला रात्री दुचाकीने वणीला जातो म्हणून घराबाहेर पडला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबीय त्याचा शोध घेत असतांनाच आज सकाळी वणी भालर मार्गावरील नगर पालिकेच्या कचरा डम्पिंग ग्राउंडजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. सकाळी या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना अज्ञात युवक मृतावस्थेत आढळून आल्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
सधन शेतकरी कुटुंबातील विवाहित युवकाने असा हा टोकाचा निर्णय घेतल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबाचा आधार असलेला युवक कुटुंबातून कायमचा निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मंगेश हा वडिलांना शेतकामात हातभार लावायचा. घरातील कर्ता पुरुष म्हणून जबाबदारी पार पाडायचा. त्याचा एक वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. सुखी संसारिक जीवन सुरु असतांना त्याने आत्मघात केल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याने नैराश्येतून आत्महत्येचा मार्ग निवडल्याने कुटुंबं पुरतं हादरलं आहे. सगळं काही सुरळीत सुरु असतांना त्याने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबं दुःख सागरात बुडालं आहे. मंगेश हा काल रात्री वणीला जाण्यासाठी दुचाकीने घरून निघाला. त्यानंतर खूप वेळ होऊनही तो घरी परतला नाही. कुटुंबियांकडून त्याचा शोधाशोध घेतला जात असतांनाच आज सकाळी शहराबाहेर डम्पिंग यार्ड जवळ त्याचा मृतदेहच आढळून आला. त्याने विषारी द्रव्य प्रश्न करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलिस या आत्महत्या प्रकरणाचा तपास करीत आहे. मंगेश याच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी व दोन भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे.
Comments
Post a Comment