रेल्वे कर्मचारी महिलेचा पती रेल्वे क्वार्टरमध्ये आढळला मृतावस्थेत
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी रेल्वे क्वार्टर येथे राहत असलेला युवक मृतावस्थेत आढळून आल्याची घटना काल १८ मार्चला मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतक युवक हा रेल्वे कर्मचारी असलेल्या महिलेचा पती होता. त्याला मद्य सेवनाची सवय जडली होती. त्यामुळे पती पत्नीत खटके उडायचे. त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं. त्यामुळे काही दिवसांपासून महिला ही माहेरी जाऊन होती. अशातच त्याचा पोटमारा होऊ लागला. काल रात्री अति मद्य सेवनामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने आपल्या आईला फोन केला. आईने त्याच्या पत्नीला फोन केला. नंतर त्याच्या चुलत भावानेही त्याच्या पत्नीला केला. तेंव्हा पत्नीने क्वार्टरकडे जाऊन पाहिले असता तिला पती हा बेडवर निपचित पडून दिसला. तिने त्याला जोरजोरात हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. पण कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा तिला संशय आला. तिने तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत युवकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. अतिश अशोक लाडे (४२) असे या मृत युवकाचे नाव आहे. मृतक हा मूळचा चंद्रपूर येथील रहिवाशी असून तो पत्नी सोबत रेल्वे क्वार्टर येथे राहायचा.
रेल्वे कर्मचारी असलेल्या सपना सालूरकर या महिलेचा विवाह काही वर्षांपूर्वी अतिश लाडे या युवकासोबत झाला होता. त्यानंतर तो महिलेसोबत रेल्वे क्वार्टर येथेच राहायचा. दरम्यान त्याला मद्य सेवनाची सवय जडली. तो मद्याच्या अगदीच आहारी गेल्याने पती पत्नीत खटके उडू लागले. त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं. प्रकरण सोडचिठ्ठी पर्यंतही आलं होतं. अशातच महिला आपल्या माहेरी निधुन गेली. ती काही दिवसांपासून आपल्या आई वडिलांकडेच राहत होती. त्यामुळे अतिश लाडे याचा पोटमारा होऊ लागला. मद्य सेवनाने त्याची प्रकृती ढासळली. काल रात्री अति मद्य सेवनामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्याने चंद्रपूला आपल्या आईला फोन केला. आईने त्याच्या पत्नीला फोन केला. मात्र त्याच्या आईचा आलेला फोन सपना सालूरकर यांच्या लक्षात आला नाही. काही वेळातच मृतकाच्या चुलत भावाने सपनाला फोन केला. तो तिने उचलला व सरळ क्वार्टरकडे धाव घेतली. तिला पती हा बेडवर निपचित पडून दिसला. तिने त्याला जोरजोरात हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. पण कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने तिला त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आला. सपनाने लगेच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत अतिश लाडे याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अतिश लाडे याच्या पश्चात पत्नी व एक चार वर्षाचं बाळ आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment