प्रशांत चंदनखेडे वणी
श्री शंकरबाबा पदावली भजन मंडळाच्या वतीने महाशिवरात्रीच्या पर्वावर ९ व १० मार्चला चिखलगांव येथे भव्य पदावली भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेचे उद्घाटन ८ मार्चला उपसरपंच सुनील कातकडे यांच्या हस्ते होणार आहे. या भजन स्पर्धेत जास्तीत जास्त भजन मंडळांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव येथे प्राचिन हेमाडपंथी शैलीचे शिवमंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी पदावली भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही श्री शंकरबाबा भजन मंडळ चिखलगावच्या विद्यमाने ही पदावली भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण १० बक्षिसे ठेवण्यात आली असून शिवभक्तांकडून वयक्तिक बक्षिसे देखील देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रथम बक्षिस हे १६ हजार रुपये ठेवण्यात आले असून शेवटची ४ हजार रुपयापर्यंतची १० बक्षिसे ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत अनेक नामवंत भंजन मंडळे सहभागी होणार आहेत. या पदावली भजन स्पर्धेचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे.
No comments: