प्रशांत चंदनखेडे वणी
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर संजय देरकर यांनी निष्ठेनं पक्षाचं कार्य केलं. पक्ष बांधणी व संघटन वाढविण्याकरिता त्यांनी सदैव प्रयत्न केले. निष्ठावान शिवसैनिक त्यांच्या नेतृत्वात तयार झाले. तळागाळातील युवकांना त्यांनी पक्षाशी जोडले. अनेक सामाजिक व सेवाभावी उपक्रम त्यांनी या काळात राबविले. पक्षवाढीकरिता तत्परतेने कार्य करणाऱ्या संजय देरकर यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर वणी विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी सोपविली. त्यांची शिवसेनेच्या (उ.बा.ठा.) वणी विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने शिवसैनिकांत उत्साह संचारला असून शिवसेनेला वणी विधानसभा क्षेत्रात एक खंबीर नेतृत्व मिळाल्याचे समाधान शिवसैनिकांमधून व्यक्त होतांना दिसत आहे. संजय देरकर यांना वणी विधासभा क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. त्यांना शिवसेनेचे वणी विधानसभा प्रमुख पद मिळाल्याने शिवसैनिकांनी शहरात एकच जल्लोष केला. काल २ मार्चला संजय देरकर यांची पद नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने शिवसेना (उ.बा.ठा.) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातून बाईक रॅली काढली. यावेळी संजय देरकर यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण केले.
संजय देरकर यांची घरोघरी शिवसैनिक तयार करण्याची संकल्पना असून त्यांच्या नेतृत्वात अनेक युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत (उ.बा.ठा.) प्रवेश केला आहे. सर्वसामान्यांचा नेता म्हणून संजय देरकर यांना ओळखलं जातं. वणी मतदार संघात त्यांच्याशी जुळलेला मोठा वर्ग आहे. एक खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. शिवसेनेच्या वणी विधानसभा प्रमुख पदावर त्यांची नियुक्ती झाल्याने शिवसैनिकात नवचैतन्य जागलं आहे. शिवसैनिकांनी वणी विधानसभा क्षेत्रात पक्ष चळवळ मजबूत करण्याकरिता तळमळीने कार्य करण्याची यावेळी संजय देरकर यांच्या नेतृत्वात हाक दिली. बाईक रॅलीत संजय देरकर यांच्यासह कामगार नेते अविनाश भुजबळराव, दीपक कोकास, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, युवासेना जिल्हा समन्वयक समीर लेनगुरे, संजय देठे, भगवान मोहिते, जगन जुनगरी, अजय चन्ने, चेतन उलमाले, प्रशांत बलकी, चैतन्य टोंगे, अमित धुरकट, कस्तुभ येरणे, प्रतिक काकडे, अवि काकडे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता.
याचवेळी पक्ष प्रवेश सोहळाही घेण्यात आला. अनेक युवकांनी संजय देरकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत (उ.बा.ठा.) प्रवेश केला. मयूर खंडरे, विजयसिंग, अक्ष गौतम, ओम पेंदोर, मंगेश मडावी, निशिकांत खोकले, राकेश वरारकर, निलेश सातपुते यांच्यासह अनेकांनी यावेळी पक्ष प्रवेश केला.
No comments: