Latest News

Latest News
Loading...

भरधाव ट्रक रोड सोडून टोल नाक्यात घुसला, सुदैवाने जीवित हानी टळली, मात्र टोल नाक्याचे झाले प्रचंड नुकसान

प्रशांत चंदनखेडे वणी 

कोळसा वाहतुक करणारा भरधाव ट्रक मुख्य मार्ग सोडून टोल नाक्याला धडकल्याची खळबळजनक घटना आज ३ मार्चला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. यात टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले असून टोल काउंटर पूर्णतः क्षतिग्रस्त झाले आहे. घुग्गुस कडून कोळसा भरून येत असलेला भरधाव ट्रक रस्ता सोडून सरळ टोल नाक्याला धडकला. या अपघातात सुदैवाने जीवित हानी टळली. टोल काउंटरवर असलेला कर्मचारी प्रसंगावधान राखत काउंटर बाहेर पडल्याने तो थोडक्यात बचावला. तर नेहमी टोल नाक्याच्या दुभाजकावर पहारा देणारा सेक्युरिटी गार्ड व इतर कर्मचारी त्याक्षणी तेथे उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. मद्यधुंद ट्रक चालकाने वणीकडे जाणारा मार्ग सोडून विरुद्ध मार्गावरील दुभाजकावर ट्रक चढवून टोल नाक्याला जोरदार धडक दिली. या धडकेत टोल नाक्याची एक बाजू व टोल काउंटर पूर्णतः उद्धवस्त झाले आहे. 

घुग्गुस कडून कोळसा भरून येत असलेला भरधाव ट्रक (MH ३४ BZ २०७२) रस्ता सोडून टोल नाक्याच्या दुभाजकावर चढला, व टोल नाक्याला जोरदार धडक दिली. मद्यधुंद ट्रक चालकाने रोड सोडून ट्रक दुभाजकावरून सरळ टोल नाक्यात घुसवला. यात टोल नाक्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. टोल काउंटर पूर्णतः क्षतिग्रस्त झाले आहे. टोल काउंटरवरील कर्मचारी प्रसंगावधान राखत काउंटर बाहेर पडल्याने तो थोडक्यात बचावला. तर टोल नाक्याच्या दुभाजकावर वाहनांना मार्ग दाखविण्याकरिता उपस्थित राहणारा कर्मचारीवर्ग त्याक्षणी तेथे उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी ट्रक चालक बबलू उर्फ प्रफुल विठ्ठल राजगडकर याला ताब्यात घेतले आहे. सदर ट्रक हा शिंदोला येथिल मोटार मालकाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. मागील काही दिवसांत अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले असून वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण राहिल्याचे दिसत नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे. 


No comments:

Powered by Blogger.