प्रशांत चंदनखेडे वणी
शहरालगत असलेल्या परिवार धाब्याच्या विरुद्ध बाजूला तलावाजवळ एक युवक मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या युवकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. आज सकाळी तो परिसरातील लोकांना तलावाजवळ निपचित पडून दिसला. त्याच्या शरीराची कुठलीही हालचाल होत नसल्याचे पाहून उपस्थितांना त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थाकडे धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. विठ्ठल आनंदराव ठावरी (३०) रा. कुरई ता. वणी असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तालुक्यात आत्महत्यांचं सत्र थांबता थांबत नसून एका पाठोपाठ होणाऱ्या आत्महत्यांनी तालुका हादरला आहे.
शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुरई या गावात वास्तव्यास असलेला विठ्ठल हा आज ३ मार्चला सकाळी तलावाजवळ मृतावस्थेत आढळून आला. त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. विठ्ठल हा दारूचा व्यसनी असल्याचे सांगण्यात येते. मृतक हा अविवाहित असून तो आपल्या आई, वडील व भावासोबत राहायचा. कामधंदे न करता कुठेही भटकायचा. त्याच्यावर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद असल्याचेही सांगण्यात येत आहे. दारूच्या नशेतच त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली असावी, असा कयास वर्तविण्यात येत आहे. आज सकाळी तो परिसरातील लोकांना निमाचीत पडून दिसला. त्यामुळे परिसरातील लोकांनी याबाबत पोलिस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा प्राथमिक तपास जमादार सिमा राठोड करीत आहे.
No comments: