राजूर (कॉ.) येथे यावर्षीही साजरा होणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील राजूर (कॉ.) येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. २८ मार्चला छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार जयंती साजरी करण्यात येत असून राजूर (कॉ.) येथीही त्यांचा जयंती उत्सव उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे. यावर्षी शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राजूर (कॉ.) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील सावित्रीबाई फुले वार्ड क्र. ४ येथे साय. ५ वाजता हा जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जी.प. सदस्य संघदीप भगत हे राहतील. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, ग्रामपंचायत सदस्य अमर तितरे, शिक्षक अजय कंडेवार, ग्रा.प. सदस्य रेहाना सिद्धीकी, राजूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक भगत, कॉम्रेड कुमार मोहरमपुरी, माजी सरपंच प्रणिता मोहमद असलम, ग्रा.प. सदस्य बबिता सिंग, ग्रा.प. सदस्य ओम चिमुरकर हे उपस्थित राहणार आहे. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. यावेळी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शूरगाथेवर प्रकाश टाकणारी वक्तव्य स्पर्धा यावेळी आयोजित करण्यात आली आहे. तसेच शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारणारी स्पर्धा देखील यावेळी होणार आहे. या दोन्ही स्पर्धांकरिता आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे. रात्री ८ वाजता क्लासिकल नृत्य व सुरसंगीताचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. जल्लोषात साजरा होणाऱ्या या जयंती महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा युवासेनेचे राजूर शाखा प्रमुख अमृत फुलझेले यांनी केले आहे.
Comments
Post a Comment