धनोजे कुणबी महिला विकास संस्थेची कार्यकारणी गठीत, किरण देरकर यांची तज्ञ संचालक मार्गदर्शक पदी निवड
प्रशांत चंदनखेडे वणी
धनोजे कुणबी महिला विकास संस्थेची नुकतीच कार्यकारणी गठीत करण्यात आली. या नव्याने गठीत करण्यात आलेल्या कार्यकारणीत किरण देरकर यांची तज्ञ संचालक मार्गदर्शक म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर संस्थेच्या अध्यक्षपदी साधना गोहोकार, उपाध्यक्ष वंदना आवारी व सचिव पदी अर्चना बोदाडकर यांची निवड करण्यात आली आहे. धनोजे कुणबी महिला विकास संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असून महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यात येतो.
सन २००९ मध्ये धनोजे कुणबी महिला विकास संस्था नावाचे इवलेशे रोपटे लावण्यात आले होते. आज या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या संस्थेला आता १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. १४ वर्षा आधी धनीजे कुणबी महिला समाजाच्या वतीने शारदा उत्सव या कार्यक्रमाची संकल्पना आखण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सुप्त कला गुणांना आकार देणारं एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं. शारदा उत्सव कार्यक्रमासाठी महिला एकत्रित येऊ लागल्या. या निमित्ताने महिलांचा आत्मविश्वास वाढविणारे कार्यक्रम घेण्यात आले. आता धनोजे कुणबी महिला विकास संस्थे मार्फत महिलांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी म्हणून विविध सांस्कृतिक, सामाजिक व बौद्धिक कार्यक्रम घेतले जातात. महिलांच्या आंतरिक इच्छा व छंद जोपासले जावे, याकरिता संस्थेच्या पुढाकारातून विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु असते. दर तीन वर्षांनी या संस्थेचा अध्यक्ष बदलण्याचा नियम बांधण्यात आला आहे. तसेच शारदा उत्सव समितीचा अध्यक्ष देखील दर वर्षी बदलण्यात येतो. त्यामुळे समाजातील प्रत्येक महिलेला आयोजन, नियोजन व नेतृत्वाची संधी मिळते. अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळतो. धनोजे कुणबी महिला विकास संस्थेचा मागील तीन वर्षाचा कार्यकाळ संपल्याने संस्थेची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.
यामध्ये अध्यक्ष म्हणून साधना गोहोकार, सचिव अर्चना बोदाडकर, उपाध्यक्ष वंदना आवारी तर तज्ञ संचालक मार्गदर्शक म्हणून किरण देरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी घेण्यात आलेल्या सभेला संस्थेच्या माजी अध्यक्षा किरण देरकर, मिनाक्षी देरकर, लता वासेकर, कविता चटकी, सविता गौरकार, शारदा ठाकरे, वनिता काकडे, संगिता खाडे, स्मिता नांदेकर यांची उपस्थिती लाभली.
Comments
Post a Comment