प्रशांत चंदनखेडे वणी
हे दोनही तरुण पल्सर (RS २००) या दुचाकीने भरधाव जात असतांना गणेशपूर (खडकी) फाट्याजवळ अचानक त्यांच्या दुचाकीला म्हैस आडवी आली. भरधाव दुचाकी म्हशीला धडकल्याने दोन्ही तरुण रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेत शिवारातील एका खड्ड्यात गंभीर अवस्थेत रात्रभर हे तरुण पडून राहिले. दरम्यान दुखापतग्रस्त या दोन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आज सकाळी ८ वाजता शेतकरी शेतात गेला असता त्याला दोनही तरुण मृतावस्थेत आढळून आले. शेतकऱ्याने लगेच ही माहिती मुकुटबन पोलिसांना दिली. मुकुटबन पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मध्यरात्री दुचाकीने जात असलेल्या तरुणांच्या दुचाकीला म्हशीच्या रूपाने काळ आडवा आला. आणि मार्गात दबा धरून बसलेल्या मृत्यूने आपला डाव साधला. नियतीने या दोन्ही तरुणांना कायमचे हिरावून घेतले. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलेल्या या तरुणांच्या अपघाती मृत्यूने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे.
No comments: