गिट्टी खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
प्रशांत चंदनखेडे वणी
गिट्टी खाणीत कपडे धुण्याकरिता गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज ४ एप्रिलला दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. विद्या अनिल आडे (१५) रा. मोहदा असे या दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्या मुलीचे नाव आहे. गिट्टी खाणीत पाणी साचून तयार झालेल्या तळ्यात कपडे धुण्याकरीता गेलेल्या या मुलीचा पाय घराला, व ती पाण्यात बुडाली. मोहदा गावालगत अनेक गिट्टी खाणी असून काही खाणीतील उत्खनन बंद झाल्याने या खाणींमध्ये पाणी साचून मोठंमोठे तळे तयार झाले आहेत. या गिट्टी खाणीत तयार झालेल्या तळ्यात परिसरातील महिला व मुली कपडे धुण्याकरिता जातात. ही मुलगी देखील कपडे धुण्याकरिता गेली होती. परंतु कपडे धुतांना तिचा पाय घसरला, व हा अनर्थ घडला.
मोहदा येथील रहिवासी असलेली विद्या ही नेहमी प्रमाणे कपडे धुण्याकरिता गिट्टी खाणीत गेली. खाणीत तयार झालेल्या तळ्यात कपडे धुत असतांना अचानक तिचा पाय घसरला, व ती तळ्यात पडली. बंद अवस्थेत असलेल्या या गिट्टी खाणीत प्रचंड पाणी भरले असून याठिकाणी मोठे तळे तयार झाले आहे. कपडे धुतांना विद्या पाय घसरून खाणीत पडली, व खोल डोहात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोहदा येथे गिट्टी खाणींचं जाळं पसरलं आहे. काही गिट्टी खाणी बंद अवस्थेत असून या खाणींमधून गिट्टीचे उत्खनन बंद झाल्याने या खाणीमध्ये पाणी साचून मोठे तळे तयार झाले आहेत. त्यामुळे या खुल्या खाणी आता मृत्यूचा सापळा बनू लागल्या आहेत. या आधीही मोहदा येथीलच गिट्टी खाणीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला होता.
या गिट्टी खाणीमध्ये साचलेल्या पाण्याचा उपयोग कपडे धुण्याकरिता केला जात आहे. परिसरातील महिला व मुली गिट्टी खाणीत तयार झालेल्या तळ्यात कपडे धुण्याकरिता जातात. विद्या देखील गिट्टी खाणीत साचलेल्या पाण्यात कपडे धुण्याकरिता गेली असता पाय घसरून पडल्याने तिचा डोहात बुडून मृत्यू झाला. विद्याचे वडील हे मोहदा येथेच सालगडी म्हणून कामाला आहेत. तिच्यावर असा हा दुर्दैवी मृत्यू ओढावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या अशा या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment