लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती, आरोपीला पोलिसांनी केली अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील एका गावात घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर पोक्सो व विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून लग्नाच्या भूलथापा देऊन आरोपीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने मुलीला गर्भधारणा झाली असून ती तीन महिन्यांची गर्भवती राहिली आहे. मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली. मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याबाबत ८ एप्रिलला पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. राजू कवडू मडचापे (३०) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून व तिला लग्नाच्या भूलथापा देऊन तरुणाने चार ते पाच महिने तिचं शारीरिक शोषण केलं. आरोपीने वारंवार मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने तिला गर्भधारणा झाली. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांकडे नेल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे कळताच पालक कमालीचे चिंतेत आले. पालकांनी तिला विश्वासात घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण मुलगी काहीही सांगण्यास तयार नव्हती. त्यामुळे कुटुंबीय हतबल झाले. शेवटी कुटुंबीयांनी ८ एप्रिलला मुलीवर अत्याचार व तिला गर्भवती केल्याप्रकरणी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी मुलीकडून या प्रकरणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता घराशेजारी राहणाऱ्या तरुणानेच तिचं शारीरिक शोषण केल्याचे उघडकीस आले. मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्न करण्याची ग्वाही देऊन तिचं चार ते पाच महिन्यांपासून शारीरिक शोषण करण्यात आल्याने तिला गर्भधारणा झाली. अल्पवयीन मुलीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर अकाली मातृत्व लादणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर भादंविच्या कलम ३७६ (२)(N), सहकलम ४,६ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू कवडू मडचापे असे या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात सपोनि अश्विनी रायबोले करीत आहे.
Comments
Post a Comment