आंघोळीला गेलेल्या महिलेचा स्नानगृहातच झाला अचानक मृत्यू
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील एका विवाहित महिलेचा अनपेक्षितपणे अचानक मृत्यू झाला. ही व्ह्रदयद्रावक घटना काल १६ एप्रिलला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. अश्विनी प्रशांत सालूरकर (३२) असे या अकाली व अचानक निधन झालेल्या महिलेचे नाव आहे. घरातील सर्व कामे आटपून ही महिला स्नानगृहात आंघोळीकरिता गेली. आणि तेथेच तिच्यावर काळाने झडप घातली. कुठलाही आजार किंवा दुखणं नसतांना आंघोळीकरिता गेलेली महिला अचानक मृत्युमुखी पडल्याने कुतुटूंबीयांना चांगलाच धक्का बसला आहे. अगदी काही वेळापर्यंत कुटुंबियांसोबत गप्पा गोष्टी करीत असलेली व कुटुंबाच्या डोळ्यासमोर वावरत असलेली अश्विनी काही क्षणातच सर्वांना सोडून निघून गेल्याने कुटुंबियांना दुःखं अनावर झालं आहे. तिचा अचानक झालेला मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला आहे. सुस्वभावी, मनमिळाऊ व सर्वांशी जुळवून घेणारी अश्विनी कुटुंबात हसतमुखाने नांदायची. पण नियतीने डाव साधून तिला कुटुंबापासून कायमचं हिरावून घेतलं. आणि अख्ख कुटुंबच तिच्या मायेला पोरकं झालं आहे. पती विरह योगाने विव्हळत आहे. तर चिमुकल्यांचे अश्रू थांबता थांबत नाही. सासू सासऱ्यांचं तर अवसानच गळालं आहे. तिच्या जाण्याने दोन चिमुकली मुलं आईच्या मायेला मुकली आहेत.
सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी महादेव सालूरकर यांची सून व प्रशांत सालूरकर यांची पत्नी असलेल्या अश्विनी हिचा काल रात्री १० वाजता अचानक मृत्यु झाला. घरातील सर्व कामे आटोपल्यानंतर ती स्नानगृहात आंघोळीकरिता गेली. बराच वेळ होऊनही ती स्नानगृहातून बाहेर न आल्याने तिच्या मुलीने तिला आवाज दिला. परंतु तिचा काहीच प्रतिसाद न मिळाल्याने मुलीने कुटुंबातील अन्य सदस्यांना व शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना आई खूप वेळ होऊनही बाथरूम मधून बाहेर आली नसल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी बाथरूमकडे धाव घेत जोरजोरात दरवाजा ठोठावला. परंतु महिला कुठलाच प्रतिसाद देत नसल्याचे पाहून कुटुंबीयांनी शेवटी दरवाजा तोडला. अश्विनी बाथरूममध्ये निपचित पडून होती. तिला कुटुंबीयांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी महिलेला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास सांगितले. महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. आज मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंतिम संस्काराकरिता नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. अश्विनी हिच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचं असं अचानक निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अश्विनी हिच्या पश्च्यात पती, एक मुलगी, एक मुलगा व सासू सासरे असा आप्त परिवार आहे.
Comments
Post a Comment