प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले असून नैराश्येतून युवक आत्महत्या करू लागले आहेत. शहरातील दामले फैल येथे परिवारासह राहत असलेल्या मनोज उंदीरवाडे या युवकाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. घराच्या आड्याला दोरीने गळफास लावून त्याने आपल्या जीवनाचा शेवट केला. वडिलांच्या घराशेजारीच त्याचं वास्तव्य होतं. काल २३ एप्रिलला मनोज हा त्याच्या मोठ्या मुलाला घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने ही माहिती आपल्या आजोबाला दिली. आजोबांनी लगेच घराकडे धाव घेतली. त्यांनी घरात जाऊन बघितले असता त्यांना मनोज हा घराच्या लाकडी फाट्याला दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने मनोजला खाली उतरवून तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मनोज हा मजुरीची कामे करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायचा. त्याने आत्मघात केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र त्याच्या आत्महत्या करण्याने मुलांच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले आहे. मनोज याच्या पश्च्यात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: