दोन अल्पवयीन मुलांसोबत केले अनैसर्गिक कृत्य, नराधमाला पोलिसांनी केली अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
घराशेजारी राहणाऱ्या दोन बालकांवर एका नराधमाने अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना २ एप्रिलला उघडकीस आली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी बालकांशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधमाला अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दोन महिन्यांपासून हा नराधम बालकांसोबत अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचे कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
शहरातील जत्रा मैदान परिसरातील ओमनगर येथे राहत असलेल्या एका ५६ वर्षीय नराधमाने घराशेजारी राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केले. १२ व १४ वर्षे वयोगटातील ही दोन्ही मुले आहे. आरोपीने त्यांना विविध प्रलोभने देऊन त्यांच्याशी जवळीक साधली. नंतर त्यांना आपल्या घरी बोलावून त्यांच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात त्याने मुलांसोबत वारंवार अनैसर्गिक कृत्य केले. मुलांना चॉकलेट व विविध प्रलोभने देऊन या नराधमाने सतत मुलांशी अनैसर्गिक कृत्य केल्याने मुलांच्या वागण्यात बदल जाणवू लागला. त्यामुळे कुटुंबीयांनी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्या वागणुकीत झालेल्या बदलाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हा संतापजनक प्रकार समोर आला. परंतु बदनामीच्या भीतीपोटी कुटुंबीयांनी त्यावेळी पोलिस स्टेशनला तक्रार दिली नव्हती. मात्र या नराधमाच्या वर्तनात कुठलाच बदलाव न आल्याने शेवटी मुलांच्या आई वडिलांनी हिंमत करून पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. एका मुलाच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर दुसऱ्या मुलाच्या पालकांनीही धाडस केले, व आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. बालकांवर करण्यात आलेल्या अनैसर्गिक कृत्याच्या दोन तक्रारी प्राप्त झाल्याने पोलिसांनी या खेदजनक प्रकाराची तात्काळ दखल घेत नराधमाला अटक केली. पोलिसांनी आरोपीवर भादंविच्या कलम ३७७ व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहरानी हे स्वतः करीत आहेत.
ओमनगर येथे राहणारा हा ५६ वर्षीय इसम शारीरिक अशक्तपणाचा आजारी असल्याचे सांगण्यात येते. त्याची लैंगिक क्षमता कमकुवत असून त्याला शारीरिक उत्तेजन देण्याची गरज भासते. त्याला शारीरिक उत्तेजन मिळाल्यानंतरच त्याची उत्तेजना जागृत होते, व नंतरच तो संसारिक जीवनात पूर्ण उत्साह भरू शकतो. त्याची गाडी ही पूर्णतः धक्का स्टार्ट असून धक्का दिल्याशिवाय त्याची गाडी सुरू होत नसल्याने त्याने हे धक्का तंत्र अवलंबले असल्याच्या आगळ्यावेगळ्या चर्चा पोलिस वर्तुळातूनच ऐकायला मिळत आहे. त्याने आपली काम वासना भागविण्याकरिता अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याने परिसरात चांगलाच संताप व्यक्त होतांना दिसत आहे.
Comments
Post a Comment