प्रशांत चंदनखेडे वणी
वणीच्या नाव लौकिकास पात्र ठरलेल्या श्री रंगनाथ स्वामी देवस्थान सेवा समितीची नुकतीच नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. श्री रंगनाथ स्वामी देवस्थानात घेण्यात आलेल्या सभेत नवीन कार्यकारणीचे गठन करण्यात आले. यात अध्यक्षपदी विशाल ठोंबरे तर सचिव म्हणून राजेश मागमवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर अन्य कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दुधलकर, सहसचिव रविंद्र गौरकार, कोषाध्यक्ष अनंता मिलमिले, सदस्य संजय जुनघरे, विशाल पारखी, प्रविण दोरखंडे, गजानन भटघरे, महेंद्र टिकनायत, आशिष काळे, सचिन पारटकर, धर्मेंद्र काकडे, सचिन पिदूरकर, महादेव गिरी यांचा समावेश आहे. कार्यकारणीतील सर्वच पदाधिकारी व सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्यावर देवस्थान समितीच्या पुढील कार्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
No comments: