प्रशांत चंदनखेडे वणी
वणी वरून उकनी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरु असून पावसामुळे हा रस्ता चिखलमय होत असल्याने नागरिकांचे या रस्त्याने मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. वेकोलि कडून या रस्त्याचे बांधकाम अगदीच कासवगतीने केले जात आहे. त्यामुळे हा रस्ता वेळेत पूर्ण होण्याची शक्यता कमी दिसत आहे. पाऊस पडला की या रस्त्यावर चिखल साचतो. त्यामुळे उकनी गाववासीयांचे या रस्त्याने जाणे येणे करणे कठीण झाले आहे. खान बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीकडे वेकोलिचे अधिकारी जातीने लक्ष घालत नसल्याने या रस्त्यांचे बांधकाम वेळेत पूर्ण होतांना दिसत नाही. त्यामुळे रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे गाववासीयांना जीवावर उद्धार होऊन या रस्त्यांनी मार्गक्रमण करावे लागते. वणी उकनी रस्त्याचे बांधकाम वेकोलिने हाती घेतले खरे, पण ते अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे या रस्त्याने जाणे येणे करतांना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेंव्हा या रस्त्याचे बांधकाम वेळेत पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी दिला आहे. ११ मे ला वेकोलि अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी या रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत निवेदन दिले. या निवेदनातून संजय खाडे यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना एकप्रकारे अल्टिमेटम दिला आहे.
वेकोलिने वणी उकनी या रस्त्यालगत डम्पिंग यार्ड तयार केल्याने हा रस्ता पूर्णतः बंद झाला आहे. त्यामुळे वेकोलिने पर्यायी रस्त्याचे बांधकाम सुरू केले आहे. परंतु या रस्त्याचे बांधकाम अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्याचा परिणाम उकनी गाववासीयांना भोगावा लागत आहे. अर्धवट बांधकामामुळे गाववासीयांचे या रस्त्याने मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. पाऊस पडला की या रस्त्यावर प्रचंड चिखल तयार होतो. त्यामुळे छोट्या वाहन धारकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होऊन बसते. दुचाकीचा प्रवास तर पूर्णपणेच ठप्प होतो. नागरिकांचा दैनंदिन कामांकरिता होणारा प्रवास बंद पडत असल्याने नागरिकांमधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे. अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती आहे, तर पावसाळ्यात या रस्त्याने जाणे येणे करणे शक्य होईल काय, हा प्रश्न गाववासीयांपुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे वेकोलि अधिकाऱ्यांनी जलद गतीने या रस्त्याने काम पूर्ण करून नागरिकांची प्रवासाची होणारी गैर सोय टाळावी. अन्यथा वेकोलिच्या या वेळकाढू धोरणाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
वेळेत काम पूर्ण न केल्यास आंदोलन, संजय खाडे
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाला सुरुवात होते. रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने हे काम येत्या एक महिन्यात पूर्ण होणे अशक्य वाटत आहे. उकणी येथील रहिवासी नेहमीच शिक्षण, काम, नोकरी, व्यवसाय यासाठी वणीला येतात. वेकोलिने वेळेत पक्का रस्ता बांधून दिला नाही तर वेकोलिविरोधात गावक-यांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन उभारले जाईल.
निवेदन देतांना संजय खाडे यांच्यासह प्रा. शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, संदीप कांबळे, बंडू खिरटकर, राजू चिंचोलकर, रोशन देरकर, जीवन मजगवळी, किसन पारशिवे, मनोज खाडे , निलेश हिरादेवे, स्वप्नील गोवारदिपे, अजय खाडे तथा उकणी गाववासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments: