तालुक्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच, वांजरी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील वांजरी येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ मे ला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ओमकार किशोर लडके (१८) असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. ओमकार हा दुपारी ४.३० वाजेपर्यंत गावात सर्वांच्या दृष्टीस पडला. नंतर त्याने घरी येऊन अचानक गळफास घेतला. ओमकारच्या मोठ्या वडिलांना तो घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ओमकारचे वडील किशोर लडके हे शेतकरी असून शेती सोबतच ते ऑटोचा व्यवसाय देखील करतात. तरुण मुलाने आत्महत्या केल्याने त्यांना जबर धक्का बसला आहे. 

तालुक्यात नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तरुण मुलं आत्मघात करू लागल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. वांजरी येथील शेतकरी कुटुंबातील तरुण मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. राहत्या घरी पंख्याला दुपट्ट्याने गळफास लावून त्याने जीवनाचा शेवट केला. ओमकारच्या मोठ्या वडिलांना तो घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी ही माहिती लगेच आपल्या भावाला दिली, व ओमकारला खाली उतरून तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. ओमकारला ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. नंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ओमकार हा आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या आत्महत्या करण्याचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी