कोळसा वाहतुकीच्या ट्रकची दुचाकीला धडक, एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी


प्रशांत चंदनखेडे वणी 

कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज १९ मे ला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील बेलोरा फाट्याजवळ घडली. दुचाकी वरील एक जण ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेला. तर दोन जण दुचाकी वरून उसळून लांब पडले. मुन्ना अजय गोवर्धन वय अंदाजे १९ वर्ष हा या अपघातात जागीच ठार झाला. तर हर्षल अर्जुनकर व प्रणय शंकर नवले हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. हे तीनही तरुण मूर्सा ता. भद्रावती जि. चंद्रपूर येथील रहिवाशी असल्याचे समजते. अपघाताची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना उपचारार्थ तर मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. 

घुग्गुस वरून नायगावकडे मोटारसायकलने ट्रिपल सीट जात असलेल्या दुचाकीस्वारांना (MH ३४ BQ २९४७) कोळसा भरून वणीकडे जात असलेल्या ट्रकची (MH ३४ BG ३७८३) जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दुचाकी वरील एक जण हा ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर दुचाकी वरील अन्य दोन जण उसळून रोडवर पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. हे तीनही तरुण विद्यार्थी असल्याचे समजते. ते दुचाकीने ट्रिपल सीट नायगावला जात असतांना बेलोरा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला ट्रकने मागून जोरदार धडक दिली. यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले असून ट्रक चालकांच्या निष्काळजीपणे ट्रक चालविण्याने निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी