अतिक्रमित जागेवरील पक्क्या बांधकामावरही चालविला जेसीबी, वणी वरोरा मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी वरोरा मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरुद्ध बाजूला जिल्हा परिषदेच्या मालकीची जागा असून या जागेवर अद्यावत व प्रशस्त क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली होती. त्यानुषंगाने या मैदानावरील झाडे झुडपे जेसीबीने हटविण्यात आली असून काटेरी झुडपं हटल्याने हे मैदान पूर्णतः सपाट झाले आहे. आता या जागेवर ज्यांनी अतिक्रम केले आहे, त्या अतिक्रमणावर देखील बुलडोजर चालविण्यात येत असून या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम १६ मे पासून हाती घेण्यात आली आहे. शासकीय मालकी हक्काच्या या जागेवर अनेकांनी कब्जा करून पक्के बांधकाम केले आहे. या पक्क्या बांधकामावरही आता जेसीबी चालविला जात आहे. काही नागरिक या जागेवर अनेक वर्षांपासून घरे बांधून राहत आहे. तर काही व्यावसायिकांनी या जागेवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले होते. या अतिक्रमित जागेवरील पक्क्या बांधकामावरही कालपासून जेसीबी चालविला जात असून शासकीय जागेवरील पक्के बांधकामही जमीनदोस्त करण्यात आले आहे. काल सायंकाळपर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले असून आज देखील अतिक्रमित जागेवरील बांधकामावर जेसीबी चालविला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
वणी वरोरा महामार्ग झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर उडाणपूल बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच या मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरुद्ध बाजूला असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेवर अद्यावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून असलेल्या नागरिकांची घरे व व्यावसायिकांचे कंपाऊंड जेसीबी चालवून तोडले जात आहे. येथील काही व्यावसायिकांनी शासकीय जागेवर ताबा करून पक्के बांधकाम केले होते. आशा बियरबार मालकाने शासकीय जागेपर्यंत वाढविलेले पक्के बांधकाम काल जेसीबी चालवून तोडण्यात आले. तर न्यू ज्योती बियरबारचेही कंपाऊंड हटविण्यात आले आहे. तसेच अतिक्रमित जागेवर लावण्यात आलेली दुकाने व बांधण्यात आलेली घरेही जमीनदोस्त करण्यात आली आहे.
काही नागरिक या ठिकाणी अनेक वर्षांपासून घरे बांधून राहत होते. त्या घरांमध्ये त्यांची अख्खी एक पिढीच गेली. त्यांनी एक एक पैसा जुळवून बांधलेल्या घरांवरही जेसीबी चालविण्यात आला आहे. पट्टाचारा नगर पासूनचा काही भाग जो अतिक्रमित जागेवर वसला आहे. तेथील घरे व दुकानांवर जेसीबी चालविला जात आहे. काही दिवसांनी या ठिकाणी एक अद्यावत क्रीडा संकुल उभं राहणार आहे. जे क्रीडा क्षेत्राला वाव देणारं ठरणार आहे. शासकीय जागेवरील पक्क्या बांधकामावरही बुलडोजर चालविण्यात येत असल्याने अतिक्रमित जागेवर वसलेले नागरिक आता कमालीचे चिंतेत आले आहेत.
Comments
Post a Comment