वणी तालुक्याचा ९२.५५ टक्के निकाल, दहावीच्या परीक्षेतही मुलींनीच मारली बाजी

प्रशांत चंदनखेडे वणी 

दहावीच्या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण जास्त आहे. दहावीच्या परीक्षेत मुलीच अव्वल आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचे निकाल आज २७ मे ला ऑनलाईन जाहीर करण्यात आले. बारावीच्या परीक्षेप्रमाणे दहावीच्या परीक्षेतही मुलींनीच अग्रक्रम प्राप्त केला आहे. विद्यार्थिनींनी दहावीच्या परीक्षेतही आपला दबदबा कायम राखला आहे. अमरावती विभागातून यवतमाळ जिल्ह्याचा ९५ टक्के तर वणी तालुक्याचा ९२.५५ टक्के एवढा निकाल लागला आहे. तालुक्यात मुलींनीच अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. तालुक्यातून २३३८ विद्यार्थ्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती. त्यात २१६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापकी ३९३ विद्यार्थी हे गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ८०३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६९९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २६९ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण गुण मिळाले आहेत. 

शहरातील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाचा ९६.३४ टक्के निकाल लागला असून या विद्यालयाची विद्यार्थिनी कु. आरती दिलीप गोबाडे ही ९५.२० टक्के गुण घेऊन शहरात प्रथम आली आहे. तर लॉयन्स विद्यालयाचा सौरभ चंद्रकांत ठाकरे हा विद्यार्थी ९४.६० टक्के गुण घेऊन शहरात दुसरा तर एसपीएम शाळेचीच विद्यार्थिनी कु. तेजस्वीनी राजू गव्हाणे व वणी पब्लिक स्कुलची विद्यार्थिनी आर्या मत्ते या दोघींनीही ९४.४० टक्के समान गुण घेऊन शहरातून तृतीय येण्याचा मान मिळविला आहे. कु. तेजस्वीनी गव्हाणे ही विद्यार्थिनी मैदानी खेळातही अव्वल असून ती विद्यार्थिनींना मैदानी खेळाची तालीम देखील देते. एसपीएम विद्यालयाचीच कु. प्रतिभा रामदास घागी 94 टक्के गुण घेऊन शाळेतून तिसरी आली आहे.

शहरातील शासकीय माध्यमिक विद्यालयाचा ९३.७५ टक्के निकाल लागला असून आदर्श विद्यालय ६८.६२ टक्के, जनता विद्यालय ९३.५८ टक्के, विवेकानंद विद्यालय ८३.१४, लॉयन्स स्कुल ९९.४३, नूसाबाई चोपणे विद्यालय ८५.४१, राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय १०० टक्के, वणी पब्लिक स्कुल १०० टक्के तर संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलचा १०० टक्के निकाल लागला आहे. 

विवेकानंद विद्यालयातील कु. दिपाली मारोती कातरकर ही विद्यार्थिनी ९३.६० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आली आहे. तर कु. कुमुदिनी हेमंत जोगी (९२.४०) व कु. सुहानी संतोष दुपारे (८७.२०) या दोन्ही विद्यार्थिनिंनी शाळेतून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. जनता विद्यालयातील कु. श्रुती पिसाराम वाढई ही ९३.८० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम तर भावेश सुनिल उपरे (९२.२०) हा दुसरा आला आहे. साहिल प्रदीप खिरटकर व जतीन रविकांत भोयर हे दोनही विद्यार्थी ९०.४० टक्के गुण घेऊन शाळेतून तिसरे आले आहेत. लॉयन्स स्कुल मधून सौरभ चंद्रकांत ठाकरे हा ९४.८० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम तर कु. मानसी भारत लिपटे (९३.६०) व यथार्थ अजय छल्लाणी (९३ टक्के ) हे शाळेतून द्वितीय व तृतीय आले आहेत. वणी पब्लिक स्कुल मधून कु. आर्या मत्ते ही ९४.२० टक्के गुण घेऊन शाळेतून पहिली तर कु. हर्षदा आवारी (९३.८०) व कु. गुंजन बोबडे (९२.४०) या विद्यार्थिनी द्वितीय व तृतीय आल्या आहेत. राजश्री शाहू महाराज विद्यालयातील रिबू हरिनारायण वर्मा ८१.२० टक्के गुण घेऊन शाळेतून पहिला तर कु. रूक्सार शब्बीर खान पठाण (७०.४०) व राऊतिया वंश प्रकाश (७०.२०) हे द्वितीय व तृतीय आले आहेत. आदर्श हायस्कुल मधून अंकित रामबाबू केवट हा ८१.४० टक्के गुण घेऊन शाळेतून पहिला (हिंदी माध्यम) तर कु. झिनल शेख (७६.६०, मराठी माध्यम) व कु. टीना कुंडलवार (७३.१० मराठी माध्यम) हे द्वितीय व तृतीय आले आहेत. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी