Latest News

Latest News
Loading...

रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलटले, एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी


प्रशांत चंदनखेडे वणी 

रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना ७ मे ला सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. अहेरी(बोरगाव) रेती घाटावर रेती भरण्याकरिता जात असलेले ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन वेकोलिच्या पिंपळगाव सीएचपी पासून अहेरी घाटाकडे वळण घेतांना उलटले. यात एक मजूर जागीच ठार झाला. तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे. रवि भारत मेश्राम वय अंदाजे २२ वर्षे रा. वागदरा असे या अपघातात ठार झालेल्या मजुराचे नाव असून विशाल तुळशीराम नैताम वय अंदाजे ३२ वर्षे रा. वागदरा असे जखमी झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. विशाल नैताम याचा डावा हात मोडला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. 

वणी तालुक्यातील वर्धा नदीच्या अहेरी(बोरगाव) रेती घाटावर रेती भरण्याकरिता जात असलेले ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पिंपळगाव सीएचपी जवळील अहेरी वळण रस्त्यावर उलटले. या अपघातात ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे. सकाळी रेतीची खेप आणण्याकरिता अहेरी घाटावर जात असतांना ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर वळण रस्त्यावर पलटी झाले. यात ट्रॅक्टर चालक विशाल नैताम हा थोडक्यात बचावला तर ट्रॅक्टरवर मजूर असलेला रवि भारत मेश्राम हा जागीच ठार झाला. विशाल नैताम याची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. किसन मोहबिया यांच्या मालकीचे हे ट्रॅक्टर असल्याचे समजते. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.