न.प. प्रशासनच बेजाबदारपणाचा कळस गाठते तेंव्हा....!


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी नगर पालिका सध्या कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत राहतांना दिसत आहे. वणी नगर पालिकेत अनागोंदी कारभार सुरु असून कुणाचेही कुणावर नियंत्रण राहिले नाही. नगर पालिकेचे कंत्राटदारही सैराट झाले असून सुरळीत पाणी पुरवठा व शहराची साफसफाई ठेवण्याची जबादारी ते इमाने इतबारे पार पडतांना दिसत नाही. शहरातील काही भागातील नाल्यांची साफसफाई वेळोवेळी होत नसल्याची ओरड आजही ऐकायला मिळत आहे. शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. रस्त्याच्या बाजूला कचरा जमा झालेला दिसून येतो. रस्त्यांची साफसफाई देखील व्यवस्थित होतांना दिसत नाही. त्यामुळे रस्त्यांवरून सारखी धूळ उडतांना दिसते. नगर पालिका प्रशासन तर डोळे मिटून बसलं आहे. घंटा गाड्यांकडेही नगर पालिकेचं दुर्लक्ष झालेलं पहायला मिळत आहे. विनाक्रमांकाच्या घंटा गाड्या शहरात धावत आहेत. मद्यधुंद अवस्थेत चालक घंटा गाड्या चालवतांना दिसत आहेत. घंटा गाडीवरील एका मद्यधुंद चालकाने एका व्यक्तीला धडक दिल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर वायरल होत आहे. या घटनेत दैव बलवत्तर म्हणून एका चिमुकल्यावरील दुर्दैवी प्रसंग टळला. या घंटा गाडीवर नंबरच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथे नगर पालिका प्रशासनच बेजाबदार झाल्याचे दिसून येत आहे. नगर पालिकेच्या घंटा गाड्या विनाक्रमांकाच्या धावत असतांना या वाहनांवर मात्र कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. नगर पालिकेच्या अनेक घंटा गाड्या शहरात कचरा संकलनाचे काम करीत आहे. या गाड्यांवर नंबरच नसल्याने त्यांना आरटीओने सूट दिली काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. घंटा गाडीने अपघात झाल्यास नेमकी अपघात झालेली घंटा गाडी कशी शोधायची, हा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. २८ मे पर्यंत विनाक्रमांकाच्या धावलेल्या या घंटा गाड्यांवर कार्यवाही केली जाईल काय, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. अपघातानंतर ओरड झाल्याने नगर पालिका प्रशासनाने आता घंटा गाड्यांवर नंबर लिहिणे सुरु केले. मात्र २८ मे पर्यंत विनाक्रमांक या घंटा गाड्या शहरात धावल्या आहेत. त्यामुळे नगर पालिकेच्या घंटा गाड्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याची तक्रार वजा मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी वणी वाहतूक उपशाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी