आयव्हीआरसीएल (IVRCL) कंपनी व सा.बा. विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची रविंद्र कांबळे यांची मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी
चंद्रपूर- करंजी या मुख्य मार्गाच्या देखभाल, दुरुस्ती व साफसफाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या आयव्हीआरसीएल (IVRCL) कंपनीवर तसेच या कंपनीवर कुठलेही नियंत्रण न ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी शिरपूर ठाणेदारांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. रस्त्यावरील धुळ मातीमुळे दुचाकी स्लिप होऊन होणारे अपघात बरेच वाढले आहेत. अपघातात निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. नुकताच बेलोरा फाट्यावर झालेला अपघातही दुचाकी स्लिप होऊनच झाल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ मातीचे थर जमा झाले आहेत. त्यावरून मोटारसायकल गेल्यास ती स्लिप होते. त्यामुळे मोटारसायकल अपघाताच्या घटना वाढू लागल्या आहेत. टोल वसूल करणारी कंपनी मात्र रस्त्यावरील धूळ माती साफ करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील टोल वसूल करणाऱ्या कंपनीवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे टोल कंपनी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातास कारणीभूत ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी रविंद्र कांबळे यांनी केली आहे.
चंद्रपूर-वणी-करंजी या मार्गावर आयव्हीआरसीएल (IVRCL) कंपनीचे तीन टोल नाके आहेत. चंद्रपूर ते करंजी मार्गाचे बांधकाम या कंपनीने केले असून ही कंपनी वाहनांकडून टोल वसुल करते. त्यामुळे या मार्गाची देखभाल, दुरुस्ती व साफसफाई ठेवण्याची जबाबदारी टोल कंपनीची आहे. परंतु टोल कंपनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतांना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला धूळ मातीचे थर साचले आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोळशाची भुकटी जमा झालेली आहे. या मार्गावर झाडे झुडपे देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. मार्गावरील झाडे तोडण्याचं सौजन्य देखील टोल कंपनी कडून दाखवील जात नाही. तसेच रोडच्या बाजूला जमा झालेली धूळ माती देखील साफ केली जात नसल्याने मोटारसायकल अपघाताचे प्रमाण वाढले आहे. १९ मे ला बेलोरा फाट्याजवळ दुचाकीचा अपघात झाला होता. यात एक तरुण मरण पावला. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. दुचाकी स्लिप होऊन हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. रस्त्यावर साचून असलेल्या धूळ मातीमुळे दुचाकी स्लिप होऊन एका तरुणाचा नाहक बळी गेला. टोल कंपनीने रस्त्याची साफसफाई व झाडे तोडण्याकडे लक्ष दिले असते तर कदाचित हा अपघात घडला नसता. त्यामुळे दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातास टोल कंपनीला (IVRCL) व सा.बा. विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्याला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी शिरपूर ठाणेदारांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. तसेच वेकोलिच्या मुख्य महाप्रबंधकांना कोळसा वाहतुकीच्या वाहनांवर ताडपत्री झाकण्याचे नियम पाळण्याच्या सूचना देण्याची मागणी देखील रविंद्र कांबळे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment