प्रशांत चंदनखेडे वणी
भरधाव ट्रकने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हलरला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅव्हलर मधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातात ट्रॅव्हलर मधून प्रवास करणारे सर्व प्रवासी थोडक्यात बचावले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून ट्रॅव्हलर मधील सर्वच प्रवासी सुखरूप आहेत. कुणालाही गंभीर इजा झालेली नाही. हा अपघात १ जूनला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वणी मारेगाव मार्गावरील निंबाळा फाट्यापासून काही अंतरावर झाला. धडक एवढी जोरदार होती की ट्रॅव्हलर बस चेंडू सारखी उसळून ५० फूट लांब फेकल्या गेली. रस्त्याच्या कडेला खोलगट भागात ही ट्रॅव्हलर कोसळली. अपघात घडताच या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांनी ट्रॅव्हलरकडे धाव घेत सर्व प्रवाशांना बाहेर काढले. किरकोळ मार लागलेल्या काही प्रवाशांना तात्काळ रुग्णायात हलविले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
वणी येथील प्रवाशांना देवदर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलर बसला निंबाळा फाटा ते सोमनाळा फाट्यादरम्यान भीषण अपघात झाला. मारेगाव कडून येणाऱ्या (MH ३४ BZ ४४१२) भरधाव ट्रकची ट्रॅव्हलरला (MH १२ KQ ३७८७) समोरासमोर जोरदार धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की, ट्रॅव्हलर बस ५० फूट लांब रस्त्याच्या कडेला खोलगट भागात फेकल्या गेली. प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हलर खोल भागात कोसल्यानंतरही प्रवासी मात्र सुखरूप बचावले आहेत. कुणालाही गंभीर स्वरूपाची इजा झालेली नाही. ट्रॅव्हलरमध्ये १५ ते १६ प्रवासी प्रवास करीत असल्याचे सांगण्यात येते. यातील दोन प्रवाशांना किरकोळ मार लागल्याची माहिती मिळाली आहे. वणी येथील ढवळे परिवार ट्रॅव्हलरने देवदर्शासाठी जात असतांना वणी पासून ८ ते ९ किमी अंतरावर हा अपघात घडला. ट्रक समोर अचानक आलेल्या एका वाहनामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले, व ट्रक विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हलरला धडकल्याचे प्रत्यक्षदर्शींमधून सांगण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: