Latest News

Latest News
Loading...

दिकुंडवार ट्युशन क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील दिकुंडवार ट्युशन क्लासेसच्या वतीने दहावीत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौणगौरव करण्यात आला. यावेळी आयोजित गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष राजू धावंजेवार होते. या सोहळ्यात दहावीच्या परीक्षेत ८५.२० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला विद्यार्थी पियुष कैलास पारखी तसेच अशोक भंडारवार (८१.२० टक्के) व आनंद भोंगडे (८०.६० टक्के) या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी राजू धावंजेवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हटले की, शिक्षक हे विद्यार्थ्यांचं भवितव्य घडविण्याकरिता हरसंभव प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून ज्ञानार्जन करून उज्वल भविष्याची पायाभरणी करावी. दहावीच्या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांनी पुढील शिक्षणही तेवढ्याच जिद्द व चिकाटीने पूर्ण करावे, ही सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिकुंडवार गुरुजींनी केले. दिकुंडवार गुरुजी हे मागील १५ वर्षांपासून विद्यार्थ्यांनाट्युशन क्लासेसच्या माध्यमातून शैक्षिक धडे देतात. त्यांच्या क्लासेस मधून अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. दर्जेदार शिक्षण देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा ते दरवर्षी कोचिंग क्लासेसच्या वतीने गुणगौरव करतात. यावर्षीही त्यांनी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव केला. 


No comments:

Powered by Blogger.