गोदावरी अर्बनचा वर्धापन दिन सोहळा संपन्न, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान तर पोलिस स्टेशनला दिले बॅरिकेट्स
प्रशांत चंदनखेडे वणी
गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनात तथा व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, उप महाव्यवस्थापक दवे, सहाय्यक महाव्यवस्थापक रवि इंगळे यांच्या पुढाकारातून गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसा. लि. वणी शाखेचा ७ वा वर्धापनदिन थाटात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुसद अर्बन को-ऑप. बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले, शाखा व्यवस्थापक विजय मोडक उपस्थित होते. वर्धापन दिनाच्या या सोहळ्यात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वणी व शिरपूर पोलिस स्टेशनला बॅरिकेट्स भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक विजय मोडक यांनी केले. त्यांनी गोदावरी अर्बनच्या यशस्वी वाटचालीचा लेखाजोगा मांडला. अल्पावधीतच प्रगतीच्या शिखरावर ही संस्था पोहचली असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. यावेळी उपस्थितांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन राजू गव्हाणे यांनी तर आभार प्रदर्शन सुरज चाटे यांनी केले.
No comments: