गळफास घेऊन युवकाची आत्महत्या, तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी शहरापासून जवळच असलेल्या राजूर (कॉ.) येथील युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १५ जूनला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विजय देवराव घोडाम वय अंदाजे ४२ वर्ष असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले असून नैराश्येतून युवक आत्महत्येचा मार्ग निवडू लागले आहेत. तालुक्यातील राजूर (कॉ.) येथील वार्ड क्रमांक ३ मधील हनुमान मंदिराजवळ वास्तव्यास असलेल्या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक युवक हा चुना भट्ट्यावर मजुरीचे काम करायचा. मजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायचा. त्याने दुपारच्या सुमारास राहत्या घरीच गळफास घेतला. तो घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटुंबियांना आढळून आला. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. विजय घोडाम याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आत्महत्या करण्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. त्याच्या पश्च्यात पत्नी, तीन मुली व दोन मुले असा मोठा आप्त परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment