जुगारावर पोलिसांची धाड, सात जुगाऱ्यांना अटक तर काही पळून जाण्यात यशस्वी
प्रशांत चंदनखेडे वणी
शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील साई नगरी जवळील भोंगळे यांच्या शेताजवळ सार्वजकनिक ठिकाणी जुगार सुरु असल्याची माहिती एपीआय दत्ता पेंडकर यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथकाला घेऊन घटनास्थळ गाठले. तेथे काही इसम गंजी पत्त्यावर पैशाचा जुगार खेळतांना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याठिकाणी धाड टाकली. तरीही पोलिसांची चाहूल जुगाऱ्यांना लागलीच. पोलिसांना पाहून काही जुगारी सुसाट पळाले. पोलिसांनी त्यांचा पाठलागही केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी घटनास्थळावरून सात जुगाऱ्यांना अटक केली आहे. दत्तू रामलू कसरेवार (४१) रा. गणेशपूर, उमेश एकनाथ खापणे (४३) रा. रविनगर वणी, मंगेश बाबाराव जगताप (३६) रा. गणेशपूर, अमर रेमाजी मडावी (४४) रा. गणेशपूर, रुपेश शांताराम वाघमारे (४७) रा. छोरीया ले-आऊट गणेशपूर, पुरुषोत्तम सापे (५५) रा. छोरीया ले-आऊट गणेशपूर, अतुल राजू घुग्गुल (२७) रा. गणेशपूर अशी या पोलिसांनी अटक केलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या जवळून १० हजार ७०० रुपये रोख व गंजी पत्ते असा मुद्देमाल जप्त केला आहे. या सातही आरोपींवर मजुकाच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर व पोलिस पथकाने केली.
Comments
Post a Comment