वणी-नांदेपेरा मार्गावर आढळला इसमाचा मृतदेह

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी-नांदेपेरा मार्गावर एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नांदेपेरा व मजरा गावादरम्यान असलेल्या सागवान वनाजवळ सदर इसम हा मृतावस्थेत आढळून आला. रमेश बळीराम निमसटकर (५७) रा. मार्डी ता. मारेगाव असे या मृतक व्यक्तीचे नाव आहे. ते घोन्सा येथील आदर्श विद्यालयात चपराशी या पदावर कार्यरत होते. १६ जूनला सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास मार्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याप कळू शकले नाही. 

१६ जूनला तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे मोठी धांदल उडाली. वणी-मार्डी हा वर्दळीचा रस्ताही पावसामुळे निर्मनुष्य झाला होता. पाऊस थांबल्यानंतर नागरिकांचे मार्गक्रमण सुरु झाले. दरम्यान या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना सदर इसम हा रस्त्यावर निपचित पडून दिसला. त्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी आसपासच्या गावात पसरली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासातून मृतकाची ओळख पटली. रमेश निमसटकर यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या अशा या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप कळू शकले नाही. पण शवविच्छेदन अहवालातून ते लवकरच स्पष्ट होईल. पुढील तपास पोलिस करीत आहे. 



Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी