Latest News

Latest News
Loading...

अति मद्य सेवनाने युवकाचा मृत्यू

प्रशांत चंदनखेडे वणी 

अति मद्य सेवनामुळे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १८ जूनला दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संदीप गुणवंत पीर (३४) रा. दीपक चौपाटी असे या मृतक युवकाचे नाव आहे. दारूच्या नशेत तर्रर्र झालेला हा युवक दीपक चौपाटी परिसरातच पडून राहिला. खूप वेळ होऊनही तो तेथेच पडून असल्याचे लक्षात येताच परिचयातील काही लोकांनी ही माहिती त्याच्या लहान भावाला दिली. लहान भावाने तो पडून असलेल्या ठिकणी येऊन त्याला उठविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्याच्या कडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून लहान भावाने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. 

शहरातील दीपक चौपाटी परिसरात राहणाऱ्या संदीप पीर या युवकाला दारूचे व्यसन जडले होते. तो दारूच्या अगदीच आहारी गेला होता. १८ जूनला त्याने मनसोक्त दारू ढोसली. अति दारू सेवनाने त्याला चांगलीच झिंग चढली. दारूच्या नशेत तर्रर्र झालेला हा युवक दीपक चौपाटी परिसरातच पडून राहिला. खूप वेळ होऊनही तो तेथेच दारू पियुन पडून असल्याचे लक्षात येताच ओळखीतल्या काही लोकांनी त्याच्या भावाला ही माहिती दिली. त्याच्या लहान भावाने तो पडून असलेल्या ठिकाणी येऊन त्याला शुद्धीवर आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्याच्या कडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत त्याचा लहान भाऊ रिकित गुणवंत पीर (२४) याने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 



No comments:

Powered by Blogger.