प्रशांत चंदनखेडे वणी
घराशेजारी राहणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचं सतत ७ ते ८ महिने शारीरिक शोषण केल्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध तरुणीच्या आजीने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ जूनला सायंकाळी गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरातील एका परिसरात घराशेजारी राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाने २० वर्षीय तरुणीशी जवळीक साधत तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला प्रेमात भावनिक करून तिचं सतत ७ ते ८ महिने शारीरिक शोषण केलं. नंतर तिच्या पासून मन भरल्यानंतर तो तिला टाळण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र तरुणीने त्याच्याकडे लग्न करण्याचा हट्ट धरल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास साफ नकार दिला. त्यामुळे आपली वासना भागविण्याकरिता त्याने आपल्यावर प्रेमाचं जाळं टाकल्याचे तिच्या लक्षात आले. खोट्या प्रेमात अडकवून त्याने आपलं शारीरिक शोषण केल्याचे लक्षात आल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या आजीला सांगितला. आजीने सरळ पोलिस स्टेशनला येऊन नातीचे शारीरिक शोषण करणाऱ्या तरुणाविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली. चंद्रकला उत्तम मडावी (७०) यांच्या तक्रारी वरून तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार अनिल बेहेरानी करीत आहे.


No comments: