एमएचटी-सीईटी परीक्षेत सोमय्या करिअर इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी चमकले
प्रशांत चंदनखेडे वणी
बारावी नंतर विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कॉमन एन्ट्रान्स टेस्ट (एमएचटी-सीईटी) परीक्षेचे निकाल १७ जूनला जाहीर झाले असून या परीक्षेत सोमय्या करिअर इंस्टिट्यूटचे विद्यार्थी चमकले आहेत. येथील बहुतांश विद्यार्थी हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. तर अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत बाजी मारली आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आता वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र शासना अंतर्गत महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाते. बारावी नंतर विद्यार्थ्यांना अनेक शाखांच्या प्रवेशासाठीचे मार्ग खुले होतात. आणि या शाखांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक संयुक्त परीक्षा घेतली जाते. त्यालाच एमएचटी-सीईटी परिक्षा म्हणतात. या परीक्षेच्या माध्यमातून बी-टेक, बीई (इंजिनिअरिंग), बी फार्मा आणि इतर इंजिनिरिंग, फार्मसी व कृषी अभ्यासक्रमाच्या बॅचलर पदवीसाठी प्रवेश मिळतो. महाराष्ट्रात प्रत्येक इंजिनिअरिंग महाविद्यालयात एमएचटी-सीईटी अंतर्गत काही राखीव जागा असतात.
एमएचटी-सीईटी परीक्षेचे १७ जूनला निकाल जाहीर झाले असून यात सोमय्या करिअर इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी चमकले आहेत. येथील बहुतांश विद्यार्थी हे उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सोहन पेंदोर हा विद्यार्थी ९४.१६ टक्के गुण घेऊन इन्स्टिट्यूट मधून अव्वल आला आहे. तसेच गौरी गोहोकार (९१.५८), देवजीत बदुगैयान (९१.६५), कपिल लडके (८५.१४) या विद्यार्थ्यांनी देखील यशोशिखर गाठले आहे.
या परीक्षेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एमएसपीएम ग्रुपचे संचालक पी.एस. आंबटकर, उपसंचालक पियुष आंबटकर, ग्रुपचे डायरेक्टर अंकिता आंबटकर तथा प्राचार्य व सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment