वाढदिवस भाऊचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा, शहरात आज धडाक्यात साजरा होणार राजुभाऊ उंबरकर यांचा वाढदिवस

प्रशांत चंदनखेडे वणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजुभाऊ उंबरकर यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !

शुभेच्छुक :-  सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी विधानसभा क्षेत्र 

राजूभाऊ उंबरकर यांचा वाढदिवस म्हणजे जल्लोषाची एक पर्वणीच. आनंदाची भरती देणारा क्षण म्हणजे राजूभाऊ यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाची पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबरच शहरवासियांनाही उत्सुकता लागलेली असते. आनंददायी वातावरणात त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यांचा वाढदिवस एकप्रकारे आनंदाचं पर्वच घेऊन येतो. शहरवासीयांचा आनंद द्विगुणित करणारा हा दिवस असतो. राजूभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तरुणांबरोबरच जेष्ठांनाही एक दिवस आनंदात घालविण्याची संधी मिळते. शहरात एकप्रकारे आनंदोत्सव साजरा केला जातो. राजूभाऊ यांचा वाढदिवस नेहमी अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवाराकडून त्यांच्या वाढदिवसाच्या आयोजनात दरवेळी वेगळंपण आणून त्यांचा प्रत्येकच वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आजही त्यांच्या वाढदिवसाची शिवतीर्थ येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहे. ढोलताशांचा निनाद व संगीताची मैफिल सजणार आहे. शिवतीर्थ आकर्षक सजावटींनी सजणार आहे. शहरात हर्षोउल्हासाचं वातावरण असणार आहे. विविध कार्यक्रमांनी रंगणार आहे आज राजूभाऊ उंबरकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा. 

राजूभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात आज एकप्रकारे उत्सव साजरा होणार आहे. विदर्भातून हजारो मनसे सैनिक वणीत दाखल होणार आहेत. दरवर्षी राजूभाऊ उंबरकर यांचा वाढदिवस साजरा करण्याकरिता विदर्भातून हजारो मनसे सैनिक शहरात दाखल होतात. आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्याची ओढ त्यांना स्वस्त बसू देत नाही. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून ते वणी येथे येऊन आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करतात. राजूभाऊ उंबरकर यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रेरित होऊन हजारो लोक त्यांच्याशी जुळले आहेत. युवावर्ग तर राजूभाऊ यांचा चाहता झाला आहे. तळागाळातील लोकही स्वयंस्फूर्तीने त्यांच्याशी जुळले आहेत. सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस म्हणून राजूभाऊ उंबरकर यांचं स्थान निर्माण झालं आहे. राजूभाऊ उंबरकर यांची मराठी माणसांशी मायेची नाळ जुळली आहे. मराठी बाणा हा त्यांचा अजेंडा राहिला आहे. उमदार व्यक्तिमत्व ही त्यांची ओळख राहिली आहे. परखडपणा हा त्यांचा स्वभावगुण राहिला आहे. समस्या कितीही गंभीर असो आणि अधिकारी कितीही मुजोर असो, झुकेगा नही म्हणत त्यांनी प्रत्येकच समस्यांचं समाधान केलं आहे. गोरगरीब व गरजूंना मदतीचा हात दिला आहे. कित्येक रुग्णांच्या उपचाराचा खर्च त्यांनी उचलला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलला आहे. पीडितांना आधार दिला आहे. महिलांचा भाऊराया बनून त्यांची साळीचोळी केली आहे. हक्कासाठीच्या आंदोलनांना नेहमी पाठिंबा देऊन आंदोलनकर्त्यांचा आवाज बुलंद केला आहे. समस्याग्रस्तांच्या पाठीशीही ते खंबीरपणे उभे राहिले आहेत. 

अशा या लोकाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस साजरा करण्याकरिता तरुणवर्ग नेहमी उत्साही असतो. मनसे सैनिकांसाठी तर त्यांचा वाढदिवस खास आकर्षण असते. त्यांच्या वाढदिवसाच्या तयारीत ते कुठलीही कसर सोडत नाही. मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवार त्यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत व्यस्त झालेला दिसून येत आहे. राजूभाऊ उंबरकर या कार्यतत्पर व्यक्तिमत्वाला वाढीदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ! त्यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याचा अनंत शुभेच्छा !

 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी