Latest News

Latest News
Loading...

संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये प्रवेश देणे सुरु, नर्सरी, केजी-१, केजी-२ करीता केवळ १ हजार रुपये प्रवेश शुल्क


प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये वर्ष २०२४-२०२५ करीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून नर्सरी, केजी-१, केजी-२ यासह वर्ग १ ते १० पर्यंत प्रवेश देणे सुरु झाले आहे. नर्सरी, केजी-१ व केजी-२ मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता केवळ १ हजार रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. १ हजार रुपयात संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्याची ही सुवर्ण संधी चालून आली आहे. तेंव्हा या संधीचा लाभ घेऊन पालकांनी आजच संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करून घ्यावा. नाममात्र प्रवेश शुल्कात दर्जेदार इंग्रजी माध्यमाचं शिक्षण संताजी स्कुलमध्ये घेता येणार आहे. इतर इंग्लिश मिडीयम शाळांच्या तुलनेत अगदीच कमी प्रवेश शुल्क आकारून मुलांचं शैक्षणिक भविष्य घडविण्याचा विडा संताजी स्कुलने उचलला आहे. तेंव्हा इंग्रजी माध्यमिक शाळेत आपल्या मुलांचा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी त्वरित संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये येऊन प्रवेशाची निश्चिती करून घ्यावी. 

सर्वोदय चौकातील मोक्षधाम रोडवर असलेल्या संताजी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल ही मागील अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून या शाळेकडे पाहिलं जातं. यंदाही या शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. यशाची परंपरा कायम राखणारी ही शाळा असून या शाळेत नर्सरी, केजी-१ आणि केजी-२ मध्ये प्रवेश घेण्याकरिता  केवळ १ हजार रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेता यावं हा या मागचा उद्देश आहे. तेव्हा पालकांनी या संधीचा फायदा घेऊन त्वरित संताजी स्कुलमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करून घ्यावा. नर्सरी, केजी-१, केजी-२ यासह १ ते १० पर्यंतचे प्रवेश देणे सुरु झाले आहे. या शाळेत प्रवेश घेण्याकरिता पालकांनी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड व जन्म प्रमाणपत्र सोबत आणावे. प्रवेशाच्या अगदीच मोजक्या जागा शिल्लक राहिल्या आहेत. तेंव्हा शीघ्र शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी सुविधा 
अगदी गावाच्या मधोमध शाळेची प्रशस्त इमारत असून शाळेत अनुभवी शिक्षकांचा भरणा आहे. तसेच या शाळेत डिजिटल शिक्षण व संपूर्ण क्लासरूम ही डिजिटल आहे. विद्यार्थ्यांना संगणकाचे संपूर्ण शिक्षण दिल्या जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी ऍक्टिव्हीटी हॉलची सुविधा आहे. खेळामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी शाळेत विविध इनडोअर व आऊटडोअर खेळ घेतल्या जातात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शाळाही सीसीटीव्ही सर्विलन्समध्ये आहे. वाचन कक्षाची व्यवस्था व  सोबतच लॅबोरेटरी ची व्यवस्था देखील आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी वाचन साहित्य उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम व वार्षिक स्नेहसंमेलनाचे देखील आयोजन करण्यात येतात.

No comments:

Powered by Blogger.