Latest News

Latest News
Loading...

राजकीय स्वार्थासाठी नाही तर खरंच मला जनतेचा लळा आहे.. मनसे नेते राजु उंबरकर, शिवतीर्थ येथे थाटात संपन्न झाला अभिष्टचिंतन सोहळा


प्रशांत चंदनखेडे वणी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य नेते राजु उंबरकर यांचा वाढदिवस शिवतीर्थ येथे धडाक्यात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते व युवावर्गाने एकच जल्लोष केला. अभिष्टचिंतन सोहळ्यात तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. शहरवासीयांनीही त्यांचा वाढदिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला. फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. आकर्षक सजावटींनी शिवतीर्थ सजला होता. संगीताच्या तालावर तरुणाई बेधुंद थिरकली. लहान मुलांपासून तर जेष्ठांपर्यंत सर्वांनीच राजू उंबरकर यांच्या वाढदिवसाचा मनमुराद आनंद लुटला. शिवतीर्थावर आनंदाचं वातावरण दिसून येत होतं. आनंदमय वातावरणात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राजू उंबरकर यांचा वाढदिवस म्हणजे आनंदाची पर्वणी ही संकल्पनाच आता रूढ झाली आहे. आनंदाला सिमा नसतात पण तो व्यक्त करण्याला तसं वातावरण हवं असतं. आणि ते वातावरण राजू उंबरकर यांच्या वाढदिवसाला असतं. त्यामुळे वाढदिवस नेत्याचा, दिवस हा आनंदाचा, ही त्यांच्या वाढदिवसाची एक वेगळी परिभाषा तयार झाली आहे. शहरवासियांचा आनंद द्विगुणित करणारा राजू उंबरकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा सर्वांच्याच डोळ्याचे पारणे फेडून गेला. लहान मुले, तरुण, युवक, वयस्क, वयोवृद्ध आणि तरुण मुली व महिलांच्या डोळ्यातील आनंद व प्रेम पाहून मी अक्षरशः भारावून गेलो असल्याची भावनिक प्रतिक्रिया राजू उंबरकर यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्यातून व्यक्त केली. धन संपत्तीचा हा हव्यास निष्फळ असून लोकांचं आपल्यावर आसलेलं प्रेम हीच खरी संपत्ती आहे. सरते शेवटी सगळं काही इथंच राहतं पण आपण केलेलं चांगलं कार्य सदैव लोकांच्या स्मरणात रहातं. त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी नाही तर खरंच मला जनतेचा लळा आहे. तेंव्हा असच तुमचं माझ्यावर निरंतर प्रेम राहू द्या, असे भावोद्गार त्यांनी यावेळी काढले. अभिष्टचिंतन सोहळ्याला युवावर्गासह थोरामोठ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दार्शविली होती.
वणी विधानसभा क्षेत्रात राजू उंबरकर यांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. सेवाभावी उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाची मनसे सैनिकांनी जय्यत तयारी केली होती. विदर्भातूनही मनसे सैनिक त्यांचा वाढदिवस साजरा करण्याकरिता वणीत दाखल झाले होते. सर्वांनीच आपल्या लाडक्या नेत्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. वणी विधानसभा क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. सायंकाळी शिवतीर्थ येथे आयोजित भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यात त्यांना शुभेच्छा देण्याकरिता नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकच जल्लोष केला. वणी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक मनसे सैनिकाने राजू उंबरकर यांच्या वाढदिवसाला उपस्थिती दर्शविली होती. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून राजू उंबरकर यांच्या वाढिदवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तर वणी विधानसभा क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबवून तथा आनंदाची उधळण करीत राजू उंबरकर यांचा वाढदिवस धडाक्यात साजरा करण्यात आला. राजू उंबरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांच्या आयोजनाची व नियोजनाची जबाबदारी मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे पार पडली. 


No comments:

Powered by Blogger.