Latest News

Latest News
Loading...

चंद्र्पुर लोससभा मतदार संघातून प्रतिभा धानोरकर यांचा दणदणीत विजय

प्रशांत चंदनखेडे वणी 

लोकसभा निवडणुकीक्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सर्वांच्याच नजरा उमेदवारांना मिळणाऱ्या मतांकडे लागल्या होत्या. उमेदवारांच्या आघाडी पिछाडीमुळे वेळोवेळी हृदयाचे ठोके वाढत होते. शेवटी लोकसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायकच लागले. चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा मतदार संघातून महाविकस आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 2 लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. भाजपच्या बालेकिल्ल्यात दुसऱ्यांदा खिंडार पाडण्याचं काम काँग्रसने केलं आहे. भाजपचे बलाढ्य उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा दारुण पराभव झाल्याने चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील भाजपचं वर्चस्व घटल्याचं चित्र दिसत आहे. सुधीर मुनगंटीवार हे काँग्रेसच्या नवख्या उमेदवारासमोर तगडं आव्हान उभं करतील असं  वाटतं होतं. पण झालं उलटच. काँग्रस व भाजपच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होईल अशी अपेक्षा असताना प्रतिभा धानोरकर यांचा एक तर्फा विजय झाला. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व पर्यायाने भाजवर चिंतनाची वेळ आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी पहिल्यांदा खासदारकी लढवितांना भाजपच्या मातब्बर नेत्याला धूळ चारली होती. तर त्यांच्या पत्नीनेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पहिल्यांदाच खासदारकी लढवीत विजय साकार केला. त्यांनीही भाजपच्या बलाढ्य उमेदवाराला मात देत विजयाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळे बाळू धानोरकर यांच्या विजयाचा रथ पुढे नेत त्यांच्या पत्नीनेही आपली प्रतिभा सिद्ध केली आहे  त्यांच्या विजयामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून विजयाचा गुलाल उधळला जात आहे  प्रतिभा धानोरकर यांनी आपले प्रतस्पर्धी उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा 2 लाखाहून अधिक मतांनी पराभव करीत गड राखला आहे. प्रतिभा धानोरकर यांना ६ लाख ६५ हजार ३९३ मते मिळाली. तर सुधीर मुनगंटीवार यांना ४ लाख २५ हजार ७१४ मते मिळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

प्रतिभा धानोरकर यांनी सुरुवातीपासूनच मताधिक्यांनी आघाडी घेतली होती. निकालपूर्व चाचण्यांमध्येही त्यांच्याच विजयाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यांच्या विजयासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली पूर्ण ताकद झोकली होती. कुठलेच मतभेद न ठेवता सर्वांनीच जोरदार प्रचार केला. प्रतिभा धानोरकर यांना निवडून आणायचच हा जोश त्यांनी मतदारांमध्ये भरला. आणि त्यांनी घेतलेल्या परिश्रमाला आता यश मिळालं आहे. माहविकास आघाडीत जल्लोषाचं वातावरण असून प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या संजय खाडे यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याकरिता महाविकास आघाडीच्या सर्वच नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आव्हान केले आहे. सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विजयी जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. 

भाजपचे उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा झालेला दारुण पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हाळी लागण्याची चिन्हे दिसत आहे. हंसराज अहिर यांना तिकीट नाकारून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. त्यामुळे सुरुवाती पासूनच एक गट नाराज असल्याच्या चर्चा रंगत होत्या. तेंव्हा ही नाराजीच पराभवाचे कारण तर ठरली नसावी, या चर्चा आता मतदार संघात रंगू लागल्या आहेत. काहीही असले तरी सलग दुसऱ्यांदा झालेल्या पराभवामुळे भाजपवर चिंतन करण्याची वेळ आली आहे

No comments:

Powered by Blogger.