Latest News

Latest News
Loading...

डीबी पथकाने दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी शहर व तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढू लागल्याने पोलिसांवर दुचाकी चोरट्यांचा शोध लावून त्यांना अटक करण्याकरिता दबाव वाढला होता. ठाणेदारांनीही दुचाकी चोरीच्या घटनांचा छडा लावण्याचे आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकही अलर्ट झाले होते. दुचाकी चोरीच्या घटनांचा छडा लावण्याकरिता डीबी पथक शहरात गस्त घालत असतांना त्यांना दोन इसम शहरात दुचाकी घेऊन संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती मिळाली. ते दोघेही दुचाकी विक्री करिता ग्राहक शोधत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या माहिती वरून डीबी पथक सेवा नगर परिसरातील स्मशानभूमी जवळ पोहचले असता त्यांना हे दोनही इसम दुचाकी विक्री करीता ग्राहक शोधतांना आढळून आले. डीबी पथकाने दोघांनाही दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांना दुचाकी बाबत विचारले असता त्यांनी बुटीबोरी जि. नागपूर येथून दुचाकी चोरून आणल्याची कबुली दिली. तुषार उर्फ रावण रमेश कुडमेथे (२५) व राजकुमार बापूराव नैताम (३०) दोन्ही रा. जुनी वस्ती बुटीबोरी जि. नागपूर अशी या पोलिसांनी अटक केलेल्या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. 

दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने पोलिसांवर दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचा दवाब वाढला होता. ठाणेदारांनीही दुचाकी चोरट्यांचा शोध लावण्याचे डीबी पथक व बिट जामदारांना आदेश दिले होते. त्यामुळे डीबी पथकही अलर्ट मोडवर आले. दुचाकी चोरट्यांचा शोध लावण्याकरिता डीबी पथक ३ जूनला शहरात गस्त घालत असतांना जमादार विकास धाडसे यांना दोन इसम दुचाकी घेऊन संशयास्पद स्थितीत शहरात फिरत असल्याची माहिती मिळाली. ते दोघेही स्मशानभूमीजवळ दुचाकी विक्री करीता ग्राहक शोधत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या माहिती वरून डीबी पथकाने सेवा नगर परिसर गाठला. पथकाला स्मशानभूमीजवळ दोन इसम दुचाकी घेऊन उभे असल्याचे आढळून आले. डीबी पथकाने त्यांना दुचाकी बाबत विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पथकाने त्या दोघांनाही दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी २ जूनला साई मंगल कार्यालय बुटीबोरी येथून दुचाकी चोरून आणल्याची कबुली दिली. त्यामुळे डीबी पथकाने बुटीबोरी पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांना फोन लावून शहनिशा केली असता तेथे दुचाकी चोरीचा गुन्हा नोंद असल्याचे समजले. पोलिसांनी आरोपी तुषार उर्फ रावण रमेश कुडमेथे व राजकुमार बापूराव नैताम यांना अटक करून त्यांच्या जवळून MH ४० AW ९२२९ क्रमांकाची हिरो पॅशन प्रो कंपनीची दुचाकी जप्त केली आहे. सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदशनात व ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या आदेशावरून डीबी पथकाने केली. 

No comments:

Powered by Blogger.