प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील मेंढोली येथिल युवकाने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आज १० जुलैला सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राकेश नत्थू उलमाले (३३) असे या विषाचा घोट घेतलेल्या युवकाचे नाव आहे. तो वडिलांना शेतीच्या कामात हातभार लावायचा. त्याने असा हा आत्मघाती निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मेंढोली येथे परिवारासह वास्तव्यास असलेल्या राकेश उलमाले या विवाहित युवकाने घरी कुणी नसल्याची साधून शेतीच्या फवारणी करीता आणलेले कीटकनाशक पिऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्याला अडीच वर्षाची मुलगी असून मुलीची प्रकृती ठीक नसल्याने त्याची पत्नी मुलीला घेऊन दवाखान्यात गेली होती. तर त्याचे वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. ही संधी साधून त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आपल्या जीवनाचा शेवट केला. वडील घरी परतल्यानंतर त्यांना मुलाने विष प्राशन केल्याचे लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला वणी येथे रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. राकेश याने आत्महत्या केल्याने कुटुंबं दुःखं सागरात बुडालं आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबं पोरकं झालं असून चिमुकलीच्या डोक्यावरील पित्याचं छत्र हरपलं आहे. त्याच्या पश्च्यात वडील, पत्नी, मुलगी असा आप्त परिवार आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


No comments: