Latest News

Latest News
Loading...

रेल्वेच्या धडकेत इसमाचा मृत्यू, कोना रेल्वे पुलाजवळील घटना

प्रशांत चंदनखेडे वणी 

रेल्वेने कटून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आज आणखी एका इसमाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वणी माजरी रेल्वे मार्गावरील कोना गावाजवळ असलेल्या वर्धा नदीवरील रेल्वे पुलाजवळ धनबाद कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेसने धडक दिल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज ९ जुलैला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. रेल्वे रूळ ओलांडताना प्रवासी रेल्वेची जोरदार धडक बसल्याने या इसमाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. महादेव परचाके (७०) रा. कोना असे या रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. 

नागपूर वरून वणी मार्गे कोल्हापूरला जात असलेल्या धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेसची कोना रेल्वे पुलाजवळ रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या वृद्धाला जोरदार धडक बसली. यात तो रेल्वेखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. महादेव परचाके हे कोना या गावचे सरपंच असल्याचे समजते. निर्गुडा नदीवरील रेल्वे पुलाजवळ तेलंगणा एक्सप्रेसने कटून आदित्य दुर्गे या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच कोना रेल्वे पुलाजवळ दीक्षाभूमी एक्सप्रेसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील पोलिस करीत आहे. 

 


No comments:

Powered by Blogger.