मैत्रीचं नातं जीवापाड जपणाऱ्या मित्रांनी वृक्षारोपण करून साजरा केला मित्राचा वाढदिवस, स्मशानभूमी परिसरात लावली तब्बल २२ झाडे
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील वागदरा या गावात मैत्रीची मिसाल कायम करणारा एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. एखाद्या नेत्याच्या किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केल्याचे आपण बरेचदा पाहिले आहे. पण एका आपल्या सामान्य मित्राच्या वाढदिवसाला त्याच्या जिवलग मित्रांनी एकत्र येत एक दोन नाही तर तब्बल २२ झाडे लावली आहेत. मैत्रीच्या नात्यातली ही दिलदारी क्वचितच पाहायला मिळते. मैत्रीच्या नात्यातली ही गुंफण पाहून "मित्र वणव्यातही गरव्या सारखा" या कवींच्या ओळी सार्थक झाल्यासारख्या वाटतात. वागदऱ्यात कट्टर मैत्री जपणारा एक ग्रुप आहे. सुखदुःखात एकमेकांना आधार देणारे हे मित्र आहेत. जिथे नाते संबंध थिटे पडतात, तिथे हे मित्र एकमेकांच्या कामी पडतात. प्रसंग कोणताही असो, हे मित्र एकत्र येऊनच त्यावर चर्चा करतात. त्यांच्या मैत्रीतलं सातत्य कित्येक वर्षांपासून त्यांची मैत्री टिकवून ठेवण्यात महत्वपूर्ण ठरलं आहे. समन्वय आणि सामंजस्यपाना हा त्यांच्या मैत्रीतला खरा गुणधर्म राहिला आहे. त्यामुळे आजही त्यांची मैत्री तेवढीच निखळ व जिवलग आहे.
मैत्रीच्या या ग्रुप मधील जिवलग मित्र कानोबा कावडे यांचा वाढदिवस साजरा करण्याचा मित्रांचा निर्णय झाला. त्यावर सर्वांचे एकमतही झाले. मग वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची व्युव्हरचना आखण्यात आली. सध्या पर्यावरण हा जिव्हाळ्याचा विषय बनल्याचे मित्रांना माहिती होते. शासन पर्यावरण पूरक उपक्रमांना प्राधान्य देत असल्याचीही त्यांना कल्पना होती. प्रदूषणावर मात करण्याकरिता व पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता वृक्षलागवड हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांच्या चर्चेतून समोर आले. त्यामुळे आपल्या जिवलग मित्राच्या वाढदिवसानिमित्त विव्हाळ्याचाच विषय हाताळण्याची तयारी त्यांनी दर्शविली. आणि साकारला त्यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपणाचा हा उपक्रम. सर्व मित्रांनी कानोबा कावडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्याचे ठरविले. आणि आपल्या मित्राच्या वाढदिवशी एक दोन नाही तर तब्बल २२ झाडे त्यांनी लावली. एका राजकीय, सामाजिक व प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाला थातुर मातुर वृक्षारोपण करून वाहवाही लुटणाऱ्या लोकांपुढे या सर्वसामान्य मित्र मंडळाने एक आदर्श ठेवला आहे. कुठलीही स्वार्थ भावना नाही, काहीही साध्य करायचे नाही, केवळ मित्राचा वाढदिवस आणि नैसर्गिक वातावरण निर्मिती हाच झाडे लावण्यामागचा एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी निखळ मानाने बोलून दाखविले.
वृक्षरोपणाला चालना देणारा हा उपक्रम राबविणारे मैत्री ग्रुपचे शिलेदार आहेत नरेंद्र (पप्पू) सिरसाट, प्रकाश मेश्राम, शिवेंद्र ब्राह्मणकर, बाळू बुगेवार, गजानन बोढाले, बापू मडावी, दशरथ वाघमारे, नागोजी बदखल, आशिष मडावी, सागर कुत्तरमारे, नयन क्षीरसागर, प्रतीक येडमे, कृष्णा चिवाने, बंटी पाचभाई, प्रतीक नैताम, यश तिखट, गोल्डी टेकाम, लक्ष नैताम, सोहम पंडिले, सौरव नैताम व ओम ढेंगळे. या मित्र मंडळाने गावातील स्मशानभूमी परिसरात वृक्ष लागवड करून वृक्ष लागवडीच्या या महत्वाच्या कार्यात आपला सहभाग दर्शविला आहे. वृक्ष लागवडीच्या या उपक्रमात प्रशांत जुमनाके, दादाजी पोटे, तेजस सिरसाट, गुरुदेव सूर्यवंशी, शंकर नासरे, दिलीप ओचावार, शौकत अली, विलास भट, शाबीत मिस्त्री, धीरज गेडाम, अशोक ढेंगळे, किसान पोतराजे, सुधाकर शिदूरकर, अमोल कोडापे, विकी नैताम, गुड्डू जाधव, सुभाष कोडापे, आशिष बदखल, अनिकेत पोतराजे, अविनाश कावडे तथा पेरसोपेन क्रीडा मंडळाचे खेळाडू व गावकऱ्यांचीही उपस्थिती लाभली.


No comments: