Latest News

Latest News
Loading...

जनहित कार्याचा वसा घेतलेल्या संजय खाडे यांचं चालतं फिरतं जनहित केंद्र, उद्या होणार या मोहिमेचा शुभारंभ

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी विधानसभा क्षेत्रातील उभरतं राजकीय नेतृत्व म्हणून समोर आलेल्या संजय खाडे यांनी जनसेवेचा ध्यास घेतला आहे. लोकहिताचे कार्य करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. जनकार्यात स्वतःला वाहून घेत त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील समस्या सोडविण्याचा विडा उचलला आहे. जनतेचे प्रश्न हाताळण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आज बुलंद केला आहे. बेरोजगारीचा प्रश्न त्यांनी उचलला आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी आक्रमक भूमिकाही घेतली आहे. बेरोजगारांना न्याय मिळावा म्हणून ते रस्त्यावर देखील उतरले आहेत. सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्धही त्यांनी वेळोवेळी आवाज उचलला आहे. वीज, पाणी, व आरोग्यविषयक समस्यांना घेऊन त्यांनी प्रशासनाला धारेवर देखील धरले आहे. प्रदूषणाची समस्या देखील त्यांनी उचलून धरली. गरजू गरिबांना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविले. त्यांचा शिक्षणाचा खर्च देखील त्यांनी उचलला. समाजसेवी संस्थांना त्यांनी नेहमी आर्थिक मदत केली आहे. धार्मिक कार्यक्रमांनाही त्यांनी भरभरून दान दिलं आहे. क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा म्हणून त्यांनी विविध क्रीडा स्पर्धांना मोठमोठ्या देणग्या दिल्या आहेत. उदारमतवादी व्यक्तिमत्व म्हणून संजय खाडे यांचं नाव समोर येऊ लागलं आहे. दानशूर व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांचा नामोल्लेख होऊ लागला आहे. दातृत्व भावना जोपासणाऱ्या संजय खाडे यांनी गरजू गरिब व गरजवंतांना सढळ हाताने मदत केली आहे. वणी विधानसभा क्षेत्रात त्यांनी अनेक सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविले आहेत. जनहिताच्या कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या संजय खाडे यांनी आता "चालतं फिरतं जनहित केंद्र" ही मोहीम राबविण्याचा संकल्प केला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा शुभारंभ करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेसचे वणी विधानसभा क्षेत्राचे नेते संजय खाडे यांनी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, बेरोजगार, गोरगरीब, दिव्यांग, युवावर्ग व महिला पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रखरतेने आवाज उठविण्याचा निर्धार केला आहे. या सर्वांच्या न्याय व हक्कांसाठी चालतं फिरतं जनहित केंद्र सुरु करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सर्व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्वसामान्य जनतेचं जगणं सुलभ व्हावं हा प्रामाणिक हेतू ठेऊन संजय खाडे यांनी या मोहिमेला हात घातला आहे. ४ जुलैला सकाळी ११ वाजता खाती चौक येथे या मोहिमेचा सर्व जनतेच्या साक्षीने शुभारंभ होणार आहे. तेंव्हा "चालतं फिरतं जनहित केंद्र" या मोहिमेच्या उदघाटन सोहळ्याला तालुक्यातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून अन्यायकारक धोरणांवर आवाज उठविण्याच्या या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन काँग्रेस नेते संजय खाडे यांनी केलं आहे.  

No comments:

Powered by Blogger.