प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील रंगनाथ स्वामी मंदिराजवळ असलेल्या एका मोटसायकल दुरुस्तीच्या गॅरेजला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगीच्या ज्वाळांनी गॅरेजला पूर्णतः आपल्या कवेत घेतले असून गॅरेज मधील साहित्य पूर्णतः जाळून खाक झाले आहे. त्यामुळे गॅरेज मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाची वाहने वेळीच घटनास्थळी पोहचल्याने पुढील अनर्थ टळला. अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून आग काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना ३० जुलैला रात्री अंदाजे ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
रंगनाथ स्वामी मंदिराला लागून असलेल्या किंग स्कुटर या मोटारसायकल दुरुस्तीच्या गॅरेजला आज रात्री अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळांनी गॅरेजला पूर्णतः आपल्या कवेत घेतले. आगीत गॅरेज पूर्णपणे जळून खाक झाले आहे. गॅरेज मधील साहित्य आगीच्या भक्षस्थानी चढल्याने गॅरेज मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. गॅरेजला आग लागल्याची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आल्याने अग्निशमन दल वेळेत घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे आग काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या गॅरेजच्या आजूबाजूलाही अनेक दुकाने असून वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. सैफ चिनी यांचे हे गॅरेज असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


No comments: