रंगकाम करतांना दुर्दैवी मृत्यू झालेल्या खोब्रागडे कुटुंबियांचे विजय चोरडिया यांनी केले सांत्वन

प्रशांत चंदनखेडे वणी 

भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य व प्रतिष्ठित व्यापारी विजय चोरडिया यांच्या दातृत्व भावनेचा परत एकदा परिचय आला आहे. रंगकाम करतांना तिसऱ्या माळ्यावरून खाली पडून मृत्युमुखी पडलेल्या इसमाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विजय चोरडिया यांनी त्यांचे सांत्वन केले. या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून ३१ हजार रुपये दिले. घरातील कर्त्या पुरुषाचा असा हा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दुःखं पचविता येण्यासारखे नसले तरी कुणी सांत्वन व आधार दिला की दुःखातून बाहेर पडण्याची हिंमत मिळते. घरातील प्रमुख व्यक्तीच्या मृत्यूने दुःखात बुडालेल्या कुटुंबाला विजय चोरडिया यांनी आधार दिला. त्यांची भेट घेऊन त्यांचं दुःखं हलकं करण्याचा प्रयत्न केला. विजय चोरडिया यांच्या सदिच्छा भेटीने कुटुंबियांनाही गहिवरून आलं. त्यांनी यानंतरही या कुटुंबाला आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिल्याने त्यांना परिस्थितीशी झुंज देण्याचं बळ मिळालं आहे. 

इमारतीला रंग देतांना तोल जाऊन तिसऱ्या माळ्यावरून खाली पडल्याने बंडू तुकाराम खोब्रागडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बंडू खोब्रागडे हे रंगकाम व मजुरी करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचे. त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची भिस्त होती. परंतु नियतीने डाव साधाला व त्यांच्यावर दुर्दवी मृत्यू ओढावला. त्यांच्या अशा या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कर्ता पुरुष सर्वांना सोडून गेल्याने कुटुंबं दुःखसागरात बुडालं. सर्वसामान्य कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती संकटात मदतीला धावणाऱ्या विजय चोरडिया यांना मिळाली. त्यांनी आज २९ जुलैला दुपारी १ वाजता मृत्तक बंडू खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. खोब्रागडे कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांना ३१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. त्यांनी मदतीचा हात पुढे केल्याने कुटुंबाला दुःखात आधार मिळाला आहे. त्यांना दुःखातून सावरण्याचं बळ मिळालं आहे. मदतगार व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय चोरडिया यांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचा परत एकदा परिचय दिला आहे. दुःखं संकटात आधार बनलेल्या या व्यक्तीने कित्येकांना जगण्याचं बळ दिलं आहे. त्यांनी खोब्रागडे कुटुंबियांना दिलेल्या सदिच्छा भेटीने कुटुंबियांनाही गहिवरून आलं आहे. विजय चोरडिया यांनी कुटुंबीयांचं केलेलं सांत्वन व त्यांना दिलेल्या आधारामुळे कुटुंबियांना दुःखातून बाहेर पडण्याचं बळ मिळालं आहे. विजय चोरडिया यांच्या सोबत यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार, मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष राजू धावंजेवार, विश्व हिंदू परिषदेचे विशाल दूधबळे, अशोक सिंग, संदीप बेसरकर आदी उपस्थित होते.  



Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी