प्रशांत चंदनखेडे वणी
निर्गुडा नदीवरील रेल्वे पुलाजवळ दामले फैल येथिल एका तरुणाचा रेल्वेने कटून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज ६ जुलैला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. आदित्य रवि दुर्गे (२०) असे या रेल्वेने कटून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण एवढ्या रात्री रेल्वे रुळावर कशासाठी गेला, व तो रेल्वेखाली कसा काय आला हे मात्र अद्याप कळू शकले नाही.
काही कारणास्तव वणी मार्गे अनेक प्रवासी रेल्वे वळविण्यात आल्या आहेत. त्यात काही सुपरफास्ट एक्सप्रेसचाही समावेश आहे. वणी मार्गे वळविण्यात आलेली तेलंगणा एक्सप्रेस वणीकडे भरधाव वेगात येत असतांना रेल्वे रुळावर गेलेल्या तरुणाचा तेलंगणा एक्सप्रेसने कटून करून अंत झाला. निर्गुडा नदीच्या रेल्वे पुलाजवळ हा अपघात झाला. दामले फैल येथिल रहिवासी असलेला आदित्य दुर्गे हा तरुण रेल्वेखाली चिरडल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शहरात पाऊस सुरु असतांना एवढ्या रात्री हा तरुण रेल्वे रुळावर कशासाठी गेला हेच कळायला मार्ग नाही. मात्र तरुण मुलाचा असा हा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलिस करीत आहे.


No comments: