प्रशांत चंदनखेडे वणी
स्वातंत्र्याचा उत्सव सर्व भारतीयांनी उत्साहात साजरा करावा व स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाने तिरंग्याला सलामी द्यावी हा जागर करण्याकरिता शासनाकडून "हर घर तिरंगा" हे गौरवशाली अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाबाबत जनजागृती करण्याकरिता व हर घर तिरंगा हा संदेश घराघरात पोहचविण्याकरिता नगर पालिकेकडून काल १२ ऑगस्टला शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. सकाळी १०.३० वाजता नगर परिषद कार्यालय येथून या रॅलीला सुरुवात झाली. न. प. मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी या मोटारसायकल रॅलीला हिरवी झंडी दाखविली. शहरातील मुख्य मार्गांनी भ्रमण करीत ही रॅली नगर पालिका येथे पोहचल्यानंतर या रॅलीची सांगता झाली.
मोटारसायकल रॅलीमध्ये उपमुख्याधिकारी जयंता सोनटक्के, कर अधीक्षक तेजस हागोने, कार्यालय अधीक्षक संदीप पाटील, संगणक अभियंता सुबोध भगत, लेखापाल शंतनू चिल्लाळ, शहर संमयक मयूर मुंडाने यांच्यासह नगर पालिकेचे सर्व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

No comments: