Latest News

Latest News
Loading...

भगवा सप्ताहादरम्यान जागतिक आदिवासी दिन साजरा, शिरपूर सर्कलमध्ये करण्यात आले कार्यक्रमांचे आयोजन

प्रशांत चंदनखेडे वणी 

शिवसेनेचा (उबाठा) वणी विधानसभा क्षेत्रात भगवा साप्ताह सुरु आहे. वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात हा भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. याच सप्ताहात जागतिक आदिवासी दिनही साजरा करण्यात आला. शिरपूर सर्कल मधील गावांमध्ये जाऊन आदिवासी दिना निमित्त कार्यक्रम घेण्यात आले. या ठिकाणी आदिवासी बांधवांसह आदिवासी दिन उत्सहात साजरा करण्यात आला. 

भगवा सप्ताहादरम्यान शिरपूर सर्कल मधील कुरई, गोवारी पारडी, ढाकोरी बोरी या गावांमध्ये जाऊन संजय देरकर यांच्या पुढाकारातुन आदिवासी दीना निमित्त कार्यक्रम घेण्यात आले. आदिवासी बांधवांसोबत आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संजय देरकर यांनी बिरसा मुंडा, बाबुराव शेडमाके, श्यामदादा कोलाम, राणी दुर्गावती या महान लढवय्या क्रांतिवीरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रत्येक गावातील कार्यक्रमांना मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. बिरसा ब्रिगेट संघटने कडून कार्यक्रमादरम्यान संजय देरकर यांचा सत्कार करण्यात आला.  

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वणी विधानसभा सहसंपर्कप्रमुख संतोष माहुरे, माजी उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, तालुका प्रमुख रवी बोढेकर, जिल्हा उपसंघटीका डीमनताई टोंगे, पुष्पा भोगेकर, चंदा मून, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, संजय देठे, मंगेश मत्ते, प्रशांत बल्की, भगवान मोहिते, डॉ. जगण जुनगरी, लोकेश्वर बोबडे, विठ्ठल बोंडे, अजय कौरासे, योगीराज आत्राम, विठ्ठल ठाकरे, राजू झाडे, कवडू उईके, विनोद कुडमिते, अनिल उईके, मोरेश्वर किनाके, सुभाष उईके, आकाश आसुटकर, विकास धगडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र इददे यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनाने परिसरातील सर्व आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.

No comments:

Powered by Blogger.