Latest News

Latest News
Loading...

घरून बेपत्ता झालेल्या इसमाचा विहिरीत आढळला मृतदेह

प्रशांत चंदनखेडे वणी 

घरून बेपत्ता झालेल्या इसमाचा अखेर गावाजवळील विहिरीत मृतदेहच आढळून.आला. ही खळबळजनक घटना ११ ऑगस्टला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. अनिल भाऊराव पाचभाई (४८) असे मृतकाचे नाव आहे. 

शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुरई गावात कुटुंबासह वास्तव्यास असलेले अनिल पाचभाई हे १० ऑगस्टला पहाटे ५ वाजता अचानक कुणालाही न सांगता घरून निघून गेले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते कुठेच आढळून आले नाही. शेवटी कुटुंबीयांनी अनिल पाचभाई घरून बेपत्ता झाल्याची शिरपूर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी शीघ्र तपासचक्रे फिरविली. दरम्यान गावालगत असलेल्या विहिरीकडे पोलिसांची नजर गेली. पोलिसांनी संशयित दृष्टीने त्या विहिरीजवळ जाऊन पहिले असता त्यांना अनिल पाचभाई यांचा मृतदेह विहिरीत तरंगतांना दिसला. पोलिसांनी लगेच गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अनिल पाचभाई यांनी नैराश्येतून आत्महत्या केल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास ठाणेदार माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलिस करीत आहे.  



No comments:

Powered by Blogger.