Latest News

Latest News
Loading...

महात्मा फुले अभ्यासिकेचे उद्घाटन व करिअर कॉन्सलर विजय मुसळे यांचे व्याख्यान

प्रशांत चंदनखेडे वणी 

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वणीतील जटाशंकर चौक येथे महात्मा फुले अभ्यासिका स्थापन करण्यात आली आहे. सोमवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता या अभ्यासिकेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर शेतकरी मंदिर येथे करिअर कॉन्सलर विजय मुसळे यांचे देशविदेशातील शिक्षणाच्या संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आहे. संजय खाडे फाउंडेशनतर्फे हा उपक्रम राबविला जात आहे. स्व. रामचंद्र खाडे यांच्या स्मरनार्थ ही अभ्यासिका स्थापन कऱण्यात आली आहे. 

कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार असून माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे हे या सोहळ्याचे अध्यक्ष राहणार आहेत. आमदार सुधाकर आडबाले व माजी आमदार वामनराव कासावार हे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहेत. नरेंद्र ठाकरे, ऍड देविदास काळे, प्रा. दिलीप मालेकर, विजय मुकेवार, अरुणा खंडाळकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा - संजय खाडे

बहुतांश विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण नसते, सोयी सुविधांचा अभाव असतो. त्यामुळे त्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होतात. परीक्षार्थ्यांना शांत चित्तेने अभ्यास करावा यावा याकरिता ही अभ्यासिक स्थापन करण्यात आली आहे. वातानुकूलित उत्तम बैठक व्यवस्था, ऑनलाईन अभ्यास, सुसज्ज लायब्रेरी व अत्याधुनिक सुविधा अशी या अभ्यासिकेची वैशिष्ट्ये आहेत. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल. 

दुपारी 4 वाजता जटाशंकर चौक येथे अभ्यासिकेच्या उद्घाटनानंतर मान्यवरांचे स्वागत, मनोगत इत्यादी कार्यक्रम शेतकरी मंदिर येथे पार पडणार आहेत. तसेच करिअर कॉन्सलर विजय मुसळे यांचा 12 वी नंतर पुढे काय व देश विदेशातील शिक्षण व रोजगाराच्या संधी या विषयावर व्याख्यान होणार आहे. अभ्यासिकेचा तसेच व्याख्यानाचा परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी केले आहे.  

शेतकरी न्याय यात्रेला उत्तम प्रतिसाद, यात्रेत घोडदरा येथील विद्यार्थ्यांचे निवेदन

शेतकरी न्याय यात्रेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी लोक आशिष खुलसंगे यांना विविध समस्येवर निवेदन देत आहेत. घोडदरा येथील विद्यार्थ्यांना मारेगाव येथे शिक्षणासाठी जाण्यास कोणतेही वाहन नाही. त्यांना 3 किलोमीटरची पायपीट करत खडकी बस थांब्यावर जावे लागते. शिवाय पावसाळ्यात विद्यार्थ्यांना ओले होत जावे लागते. त्यामुळे घोडदरा येथील विद्यार्थ्यांनी बससेवा सुरु करण्याबाबत न्याय यात्रेच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. 



No comments:

Powered by Blogger.