शिवसेनेचा (उबाठा ) वणी विधानसभा क्षेत्रात भगवा सप्ताह व जनसंवाद यात्रा, ४ ऑगष्टला महाआरतीने झाली सुरुवात
प्रशांत चंदनखेडे वणी
गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक हा संकल्प उराशी बाळगून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भागवा सप्ताह व जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ४ ऑगष्ट ते ११ ऑगष्ट पर्यंत हा सप्ताह चालणार आहे. या निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. वणी वरोरा रोडवरील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ४ ऑगष्टला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी जगन्नाथ महाराज मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या वतीने भगवा सप्ताह व जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरुवात करतांना सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी शिवसैनिकांकडून महाआरती व प्रार्थना करण्यात आली. भगवा सप्ताह व जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे . या दरम्यान जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, सदस्य नोंदणी अभियान, माझी विज माझा अधिकार अभियान, प्रत्येक बुथवर मतदार यादी वाचन आदी उपक्रम राबविले जाणार आहे. तसेच जनसंपर्क वाढविणे, पक्ष बांधणी करणे, पक्ष संघटन मजबूत करणे, गावपातळीवर शिवसेनेच्या शाखा निर्माण करणे, पक्ष प्रवेश सोहळे घेणे यावर देखील भर देण्यात येणार आहे. शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात पक्षाच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांची एकजूट करण्याचा निष्ठेने प्रयत्न केला जात आहे. याच दृष्टीकोनातून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे याच्या वाढदिवसा निमित्त वणी विधानसभा क्षेत्रात भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या सुरुवातीला काल ४ ऑगष्टला जगन्नाथ महाराज मंदिरात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी महाआरती व प्रार्थना करण्यात आली.यावेळी संजय देरकर यांच्यासह शिवसेनेचे (उबाठा ) संतोष माहुरे, रवि बोढेकर, दीपक कोकास, विमल टोंगे, पुष्पा भोगेकर, सुनंदा गुहे, अजिंक्य शेंडे, सतिश गादेवार, विजय पानघंटीकर, अमजद शेख, संतोष कुचनकार, प्रेमा धानोरकर, पारखी, भगवान मोहिते, राजू ईद्दे, संजय देठे, विनोद ढुमणे, विठ्ठल बोंडे, अजय कवरासे, नंदू ढुमणे, नरेश कोठारी, राजू लडके, प्रशांत बलकी, हरिदास केळझरकर, दिवाकर भोंगळे, बंडू निंदेकर, जगन खंडाळकर, विकास धगडी, मो. असलम, सुभाष भोगेकर, श्रावण टोंगे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments: