Latest News

Latest News
Loading...

तरोडा येथील शेकडो युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

प्रशांत चंदनखेडे वणी 

आगामी विधानसभेची निवडणूक लक्षात घेता पक्षांनी संघटन बांधणीला सुरुवात केली आहे. जनसंपर्क वाढवून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव केली जात आहे. पक्षात प्रवेश घेण्याकरिता युवकांना प्रोत्साहित केले जात आहे. वणी विधानसभा क्षेत्रात पक्ष प्रवेश सोहळे सध्या धडाक्यात सुरु आहेत. काँग्रेस नेते संजय खाडे यांनी देखील जनसंपर्क वाढविला असून पक्ष बांधणी व संघटन मजबूत करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. गावागावात त्यांच्या आढावा बैठका सुरु आहेत. नुकताच त्यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. तालुक्यातील तरोडा येथील शेकडो युवकांनी त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वणी येथील निवासस्थानी हा पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला. 

सर्वसामान्यांचे हित जोपासण्याकडे होत असलेले दुर्लक्ष तथा शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्न सोडविण्याकडे डोळेझाक केली जात असल्याने नागरिकांचा काँग्रेस पक्षाकडे ओढा वाढला आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा पक्ष म्हणून आधी पासूनच काँग्रेसकडे पाहिलं जातं. दरम्यान धार्मिक कट्टरता राजकारणात आल्याने जनतेची दिशाभूल झाली होती. मात्र नागरिकांची आता काँग्रेसकडे वापसी सुरु झाली आहे. वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचं कार्य काँग्रेस नेत्यांकडून प्रभावीपणे केलं जात आहे. त्यात संजय खाडे यांनी काँग्रेसचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यांनी या काळात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सेवाभावी उपक्रमांतही त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला आहे. नुकतीच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी अभ्यासिका उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी हाती घेतलेल्या जनहित कार्यामुळे वणी विधासभा क्षेत्रात काँग्रेसचं प्राबल्य वाढू लागलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला वणी विधानसभा क्षेत्रातून ५६ हजार मतांची लिड मिळाली होती. त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसचं वर्चस्व कायम ठेवण्याकरिता मोठे प्रयत्न केले जात आहे. नुकताच संजय खाडे यांच्या नेतृत्वात तरोडा येथील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पक्ष प्रवेश घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत केलं आहे. 

यावेळी संजय खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विजयामुळे पक्षाला नवी उभारी मिळाली आहे. जनता प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे. सध्या पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. तसेच पक्ष गावागावात पोहचविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे. येत्या काळात गावपातळीवरील बहुतांश लोक काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. 

पक्ष प्रवेश सोहळ्याला देविदास काळे, पुरुषोत्तम आवारी, प्रा. शंकर व-हाटे, तेजराज बोढे, अनिल देरकर, प्रमोद वासेकर, टिकाराम कोंगरे, उत्तमराव गेडाम, जयसिंग गोहोकार, संध्या बोबडे, अनिल भोयर, मडावी, नंदेश्वर आसुटकर, रवि कोटावार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:

Powered by Blogger.